शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

गायमुख रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामाला सुरूवात, वाहतूक कोंडीत पडली भर

By अजित मांडके | Updated: May 25, 2024 17:00 IST

घोडबंदर भागातील गायमुख येथील चढण रस्त्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आल्याने त्याचा परिणाम शुक्रवारी रात्री पासून येथे वाहनांच्या रांगा लागल्याचे चित्र दिसत होते.

अजित मांडके, ठाणे : घोडबंदर भागातील गायमुख येथील चढण रस्त्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आल्याने त्याचा परिणाम शुक्रवारी रात्री पासून येथे वाहनांच्या रांगा लागल्याचे चित्र दिसत होते. त्यात शनिवारी सकाळी देखील येथील वाहतूक कोंडीत भर पडल्याचे दिसून आले. वाहन चालकांना येथून ये-जा करतांना, पाच मिनिटांच्या कालावधीसाठी पाऊण ते एक तासांचा कालावधी जात होता. बोरिवली कडे जाणाºया तसेच ठाण्याकडे येणाऱ्या अशा दोन्ही मार्गावर वाहतूक कोंडी झाली होती.  

घोडबंदर भागातील गायमुख घाट रस्ता शुक्रवार २४ मे पासून अवजड वाहनांसाठी बंद करण्यात आला आहे. या महामार्गावरील ७०० मीटर रस्त्याचे सॉईल स्टॅबिलायझेशन करून मजबुतीकरण करण्यात येणार आहे. त्यामूळे शुक्रवार २४ मे ते ७ जून पर्यंत अवजड वाहनांना या मार्गावरुन बंदी घालण्यात आली आहे. ठाणे पालिका हद्दीतील महत्वाचा आणि मुंबई अहमदाबादला जोडणाऱ्या घोडबंदर रोडवर गायमुख घाट रस्त्याचे डागडुजीचे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्यात येणार असून सार्वजनिक बांधकाम विभागाकडून हे केले जात आहे. या परिसरात वाहतूक कोंडी होऊ नये व परिसरातील वाहतूक सुरळीत व सुनिश्चित राहावी यासाठी वाहतुकीत बदल करण्याचा निर्णय वाहतूक पोलीसांनी घेतला होता. 

घोडबंदर रोडवर जड अवजड वाहनांसाठी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन वाहतूक विभागाने केले होते. परंतु या कामामुळे घोडबंदर मार्गांवर मोठ्या प्रमाणावर नागरिकांना वाहतुक कोंडीला सामोरे जावे लागत आहे. अवघ्या पाच ते दहा मिनिटांचे अंतर कापण्याकरिता वाहनचालकांना दीड ते दोन तासाचा कालावधी लागत होता. विशेष म्हणजे या कामामुळे बोरिवली कडे जाणाऱ्या आणि ठाण्याकडे येणाऱ्या अशा दोन्ही मार्गांवर ही वाहतूक कोंडी झाली होती. महत्वाचे म्हणजे रात्रीच्या वेळीही वाहनचालकांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागल्याने त्यांचे प्रचंड हाल झाले. वाहतूक पोलीस ही वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी सातत्याने प्रयत्न करताना दिसून आले. या वाहतूक कोंडीचा ठाणे आणि बोरिवली येथे कामासाठी येणाऱ्या नागरिकांना मोठया प्रमाणात फटका बसल्याचे दिसून आले.

या भागात वाहतुक कोंडी होऊ नये यासाठी वाहतुक विभाग, एमबीव्हीव्ही आणि एचएसपी यांच्या माध्यमातून वाहतुक कोंडी सोडविण्याचे प्रयत्न केले जात आहेत. मात्र सकाळच्या सत्रात फाऊंटनमार्गे अवजड वाहने येतांना अधिक प्रमाणात दिसून आले. त्यामुळे या मार्गावर वाहतुक कोंडी झाल्याचे दिसून आले. त्यामुळे ती सोडविण्यासाठी वाहतुक पोलिसांची दमछाक झाली होती.

टॅग्स :thaneठाणेTrafficवाहतूक कोंडी