शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
6
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
7
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
8
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
9
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
10
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
11
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
12
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
13
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
14
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
17
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
18
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
19
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
Daily Top 2Weekly Top 5

एका वर्षात विश्वासाचा पाया मजबूत; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला विश्वास

By अजित मांडके | Updated: May 10, 2023 11:39 IST

म्हाडाने मागील काही वर्षात लोकांच्या मनात विश्वास निर्माण केला आहे. राज्यातील सरकारला देखील पुढील वर्षी एक वर्षे पूर्ण होणार आहे.

ठाणे : घर सर्वाना मिळेल मात्र पाय मजबूत असायला हवा, राज्यातील युती सरकारला देखील पुढील महिन्यात एक वर्ष पूर्ण होत आहे, या एका वर्षात विश्वासचा पाया मजबूत झाला आहे असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे केले.

म्हाडाच्या कोकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग येथील सदनिका आणि भूखंडांच्या विक्रीकरिता सोडत आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आली.  या सोडतीत ४६४० सदनिका व १४ भूखंडांच्या विक्रीकरिता अनामत रकमेसह प्राप्त ४८,८०५ अर्जाची संगणकीय सोडत डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात काढण्यात आली.

यावेळी शिंदे हे ऑनलाइन माध्यमातुन  उपस्थित होते. प्रत्येकाचे घराचे स्वप्न असते आणि हे स्वप्न साकार करण्याचे काम म्हाडाच्या माध्यमातून होत आहे, म्हडा आपली जबाबदारी यशस्वी पेलत असल्याचेही ते म्हणाले. घराबरोबर नोकरीची जबाबदारी देखील सरकारने उचलली आहे, त्यानुसार रोजगाराची १ लाख पदे भरण्याचे काम केले जात आहे. त्यामुळे घर आणि नोकरी मिळाली तर खोळंबलेली लग्ने देखील आता होतील असेही ते म्हणाले. सोडतीत ज्यांना घरे मिळतील त्यांना त्यांच्या घरांचा ताबा लवकरात लवकर द्यावा असे निर्देश ही त्यांनी यावेळी दिले. पंतप्रधान आवास योजनेतून देखील ९८४ घरे उपलब्ध करून देण्यात आल्याचे ते म्हणाले.

यावेळी केंद्रीय पंचायत राज्यमंत्री कपिल पाटील यांनी भिवंडीतील ६ हजार रखडलेल्या घरांचा मुद्दा उपस्थित केला असता तो देखील लवकरच मार्गी लावण्यात यावा असे आदेश यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले. याशिवाय मुरबाड येथे देखील म्हाडाच्या माध्यमातून घरांची निर्मिती केली जाईल असे आश्वासन त्यांनी यावेळी आमदार किसन कथोरे यांना दिले. बीडीडी चाळीचा विकास करताना येथे १६ हजार घरे दिली जाणार आहेत, तर धारावीचा विकास देखील म्हाडाच्या माध्यमातून केला जात असल्याचे त्यांनी सांगितले. म्हाडाने मागील काही वर्षात लोकांच्या मनात विश्वास निर्माण केला आहे. राज्यातील सरकारला देखील पुढील वर्षी एक वर्षे पूर्ण होणार आहे, या युती सरकारने देखील या एका वर्ष्यात जनतेच्या मनात विश्वास निर्माण करून आपला पाया मजबूत केला असल्याचेही ते म्हणाले. राज्यात डबल इंजिनचे सरकार वेगाने काम करीत असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदे