शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

पालिकेच्या मालमत्ताकर कार्यपद्धतीत सुधारणा

By admin | Updated: November 19, 2015 00:46 IST

नागरिकांना अधिकाधिक सोयीसुविधा मिळून कामाचा निपटारा पारदर्शी आणि जलदगतीने होण्यासाठी प्रचलित मालमत्ताकर कार्यपद्धतीमध्ये पालिकेने सुधारणा केल्या

ठाणे : नागरिकांना अधिकाधिक सोयीसुविधा मिळून कामाचा निपटारा पारदर्शी आणि जलदगतीने होण्यासाठी प्रचलित मालमत्ताकर कार्यपद्धतीमध्ये पालिकेने सुधारणा केल्या असून तसा आदेश महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी जारी केला आहे. नागरिकांना केंद्रस्थानी ठेवून घेतलेला आयुक्तांचा हा आणखी एक महत्त्वाचा निर्णय आहे.यापूर्वी कर विभागाची संचिका (फाईल) ही लिपिकापासून ते उपआयुक्त, कर आणि त्यानंतर अतिरिक्त आयुक्त यांचेपर्यंत पोहोचून अंतीम होईपर्यंत १५ ते २० दिवसांचा कालावधी जायचा. आता यामध्ये सुधारणा करु न या संचिकेची केवळ तीन स्तरावरच हाताळणी होणार असल्याने ती अंतिम होण्यासाठी आता अत्यंत कमी कालावधी लागणार आहे. शिवाय आॅनलाईन पद्धतीने कर भरणाऱ्या नागरिकांना पैसे जमा केल्यानंतर काही वेळेस ते भरल्याची पावती मिळत नाही. याप्रकरणी करदात्यास कराचा परतावा भरु न परत दुसऱ्यांदा कराची रक्कम व आॅनलाईन बँकींग अधिभार भरावा लागत असे. यापुढे एकदा आॅनलाईन पैसे भरुनही पावती न मिळाल्यास आर्थिक व्यवहार झालेल्या दिवसांपासून ४ दिवसांत बँकेमधून पडताळणी करु न संबंधित नागरिकांस ई-मेलद्वारे पावती उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. त्यासाठी आॅनलाईन कर भरणाऱ्या नागरिकांचे ई-मेल आयडी, मोबाईल क्रमांक ओटीपी पद्धतीने खात्री करु न नोंद करण्यासाठी संगणक प्रणालीमध्येही सुधारणा करण्यात आल्या आहेत. जुन्या मिळकती, धोकादायक इमारती, रस्ता रु ंदीकरणात तसेच पुनर्वसनात तुटलेल्या मिळकती आदीबाबत देयके निर्गमित करण्यात येत असल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे नागरिकांना अनावश्यक मनस्ताप होऊन कराची मागणी अवाजवी पद्धतीने वाढण्याची शक्यता विचारात घेता, अशा प्रकरणी विनाविलंब स्थळ पाहणी करु न, निश्चित केलेल्या विहित नमुन्यात पंचनामा करु न, प्रकरणी मालमत्ताकर रद्द करण्यासाठी परिमंडळ उपआयुक्त यांना अधिकार प्रदान केले आहेत. मालमत्ताकराची नवीन आकारणी, मिळकतीचे हस्तांतरण, तिच्या वापरात बदल याकरीता महसूल विभागाकडील फेरफार रजिस्टरच्या धर्तीवर स्वतंत्र मालमत्ता आकारणी फेरबदल रजिस्टर ब्लॉकनिहाय ठेवण्यात येणार आहे. जेणे करुन या संदर्भात काही तक्र ार आल्यास एकत्रित माहिती मिळवून तक्र ारीचे निराकरण करता येणार आहे. तसेच ती माहिती पडताळणीसाठी उपलब्ध करु न देणेही सुलभ होणार आहे.