शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
2
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
3
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
4
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
5
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
6
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! पाकिस्तान काय करेल आणि काय नाही...
7
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
8
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
9
पाकिस्तान प्रतिहल्ला करेल?-शक्यता नाकारता येत नाही!
10
मुत्सद्देगिरी आणि सैन्यदलांचं निर्विवाद यश!
11
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
12
१८ विमानतळांवरील कामकाज तात्पुरते बंद; एकट्या इंडिगोने सुमारे १६० उड्डाणे रद्द केली
13
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  
14
विनाअपघात एसटी बस चालकांना बक्षीस देणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
15
चंद्रावर उमटणार भारतीय अंतराळवीराचे पदचिन्ह
16
राज्यात गारपिटीची, तर मुंबईत मुसळधारेची शक्यता; मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याला इशारा
17
रोहितने ‘तो’ निर्णय तेव्हाच घेतलेला? गंभीर आलेला, पण रोहित शर्मा अनुपस्थित होता... 
18
रोहित शर्माने घेतली कसोटीतून तडकाफडकी निवृत्ती; इंग्लंड दौऱ्यात मिळणार होता डच्चू...
19
गोष्ट मिठी नदीच्या न उपसलेल्या गाळाची..., गाळाने भरले भ्रष्ट अभियंत्याचे खिसे; चौकशीतून स्पष्ट 
20
उद्धव ठाकरे ‘धनुष्यबाणा’साठी पुन्हा सक्रिय; याचिकेवर सुनावणी घेण्याची मागणी

आधी स्वच्छतागृहे सुधारा

By admin | Updated: February 20, 2017 05:46 IST

अंबरनाथ नगरपालिका हद्दीत जे नागरिक उघड्यावर प्रातर्विधीस बसतात, त्यांना पकडून थेट पोलिसांच्या स्वाधीन केले जाते

अंबरनाथ : अंबरनाथ नगरपालिका हद्दीत जे नागरिक उघड्यावर प्रातर्विधीस बसतात, त्यांना पकडून थेट पोलिसांच्या स्वाधीन केले जाते. पालिकेच्या या धोरणाला काँग्रेसने विरोध केला आहे. उघड्यावर बसणाऱ्यांवर केवळ दंडात्मक कारवाईची सूचना केली आहे. गरीब नागरिकांना थेट पोलिसांच्या स्वाधीन करणे चुकीचे असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. ज्या ठिकाणी स्वच्छतागृहांची दुरवस्था झाली आहे आणि ज्या स्वच्छतागृहात पाणीच नाही, त्या ठिकाणी नागरिक उघड्यावर प्रातर्विधीस बसत असतील, तर त्याला केवळ पालिका प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप काँग्रेस नगरसेवकांनी सर्वसाधारण सभेत केला. अंबरनाथ शहर हगणदारीमुक्त करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेंतर्गत अनेक ठिकाणी पालिकेने नव्याने स्वच्छतागृह बांधले. अनेक नागरिकांना वैयक्तिक स्वच्छतागृहे बांधून दिली. मात्र, असे असतानाही काही भागांतील स्वच्छतागृहांची दुरुस्तीच झालेली नाही. पाणी नसल्यामुळे स्वच्छतागृहांचा वापर करणे नागरिकांना शक्य होत नाही. ज्या भागात एकमेव स्वच्छतागृह आहे आणि तेही सुस्थितीत नसेल, तर नागरिकांना नाइलाजाने उघड्यावर बसण्याची वेळ येते. नागरिकांची ही समस्या न सोडवता थेट उघड्यावर बसणाऱ्या नागरिकांना पोलिसांच्या स्वाधीन केले जात असल्याने नागरिकांमध्ये नाराजीचा सूर उमटत होता. त्यात जे नागरिक पकडले गेले, ते अत्यंत गरीब घरातील असून १०० ते २०० रुपयांच्या रोजंदारीवर काम करणारे मजूर आहेत. या नागरिकांना थेट पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. त्यांच्यावर कारवाई करून न्यायालयात हजर करण्यात आले. १०० रुपये दंड आकारला. ज्या नागरिकांचे हातावर पोट आहे, अशांना किमान पोलिसांच्या स्वाधीन करू नका, अशी सूचना काँग्रेसच्या नगरसेवकांनी मांडली. शहर हगणदारीमुक्त करण्यासाठी या नागरिकांवर कारवाईची भीतीच निर्माण करायची असेल, तर वेळेवर त्यांच्यावर दंडात्मक कारवाईच करा, अशी मागणी करण्यात आली. नागरिकांना ताब्यात घेतल्यावर त्यांच्या घरच्यांनाही कल्पना दिली जात नाही. अशा परिस्थितीत कुटुंबामध्ये धास्ती निर्माण होते. जे उघड्यावर प्रातर्विधीस बसतात, त्यांना गुन्हेगारासारखी वागणूक मिळणे हे नैतिकतेला धरून नसल्याचे यावेळी सभागृहात स्पष्ट करण्यात आले. (प्रतिनिधी)कामे पूर्ण न करताच बिलेच्दरम्यान, या विषयावर पालिका सभेत चर्चा सुरू असताना शहरातील अनेक स्वच्छतागृहांच्या दुरुस्तीचे काम केल्यावरही अनेक ठिकाणी ते काम पूर्ण न करताच बिले देण्यात आली, असा आरोपही करण्यात आला. च्अनेक स्वच्छतागृहांत रात्रीच्यावेळी दिवा, पाणी नसते. स्वच्छता, दरवाजेही नसतात. दरवाजांना कडी नसणे, अशी अवस्था आहे. यावरही पालिका प्रशासनाने लक्ष द्यावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली. या चर्चेत नगरसेवक उमेश पाटील, विलास जोशी, वृषाली पाटील, उमर इंजिनीअर, निखिल वाळेकर आणि उपनगराध्यक्ष राजेंद्र वाळेकर यांनी सहभाग घेतला.