शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

उल्हास नदी प्रदूषण रोखण्यासाठीची अंमलबजावणी शून्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 04:40 IST

कल्याण : उल्हास नदीपात्रात होत असलेले प्रदूषण रोखणे व जलपर्णी काढणे या दोन प्रश्नांवर मी कल्याणकर संस्थेने १८ दिवस ...

कल्याण : उल्हास नदीपात्रात होत असलेले प्रदूषण रोखणे व जलपर्णी काढणे या दोन प्रश्नांवर मी कल्याणकर संस्थेने १८ दिवस नदीपात्रात आंदोलन केले. पालकमंत्र्यांच्या आश्वासनानंतर हे आंदोलन २७ फेब्रुवारी रोजी मागे घेतले गेले. मात्र, त्यावेळी प्रशासनाने दिलेल्या आश्वासनाची अद्याप पूर्तता नाही. त्यामुळे प्रशासनाकडून प्रदूषण रोखण्यासाठीची अंमलबजावणी शून्य असल्याचा आरोप आंदोलक नितीन निकम यांनी केला आहे.

उल्हास नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी मी कल्याणकर संस्थेच्या वतीने निकम यांच्यासह कैलास शिंदे व उमेश बोरगावकर यांनी आंदोलन केले होते. १८ दिवसांनंतर पालकमंत्र्यांनी त्याठिकाणी भेट दिली. यावेळी महापालिका आयुक्त व जिल्हाधिकारीही उपस्थित होते. पालकमंत्र्यांनी तातडीने जलपर्णी काढण्यासाठी मशीन मागविण्यात यावे, त्यासाठी निविदा काढावी असे आदेश महापालिका आयुक्तांना दिले होते. दरम्यान, मशीन येईपर्यंत मनुष्यबळाचा वापर करून जलपर्णी काढण्याचे सूचित केले होते. मात्र, ते सोपे नाही. जलपर्णी मशीनद्वारे काढण्यासाठी निविदा काढण्यात येणार होती. मात्र, अशी मशीन तयार नसते. ती तयार करण्यासाठी ऑर्डर द्यावी लागते. ही सगळी प्रक्रिया पार पाडण्यात जून महिना उजाडणार असून, तोपर्यंत पावसाळा लागणार आहे. त्यामुळे मशीन मागविण्याची प्रक्रिया वेळखाऊ आहे. मशीनची किंमत ३ कोटींच्या घरात आहे. तात्पुरत्या स्वरूपात भाडेतत्त्वावर मिठी नदीच्या ठिकाणाहून मशीन मागविण्याचा प्रस्ताव आहे. त्यामुळे मशीन मागवून जलपर्णी काढण्याच्या आश्वासनाची पूर्तता होत नसल्याचे दिसून येत आहे. याशिवाय चंद्रशेखर भडसावले या पर्यावरण तज्ज्ञांच्या मदतीने हर्बल फवारणी करून जलपर्णी समूळ नष्ट करण्याचा प्रयत्न केला जावा. त्यासाठी निकम यांनी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान भडसावले यांची मदत घेण्याच्या कामाचे काय झाले याची विचारणा केली. त्यावर नार्वेकर यांनी नदीचे पाणी लाखो लोक पितात. हर्बल फवारणीने रिॲक्शन झाल्यास त्याला जबाबदार कोण, त्याची शहानिशा केल्याशिवाय हा प्रयोग करता येणार नाही, असे मत व्यक्त केले. त्यामुळे मशीनद्वारे जलपर्णी काढणे व हर्बल फवारणी करून समूळ नष्ट करणे ही दोन्ही आश्वासने पूर्ण झालेली नाहीत. आंदोलन मागे घेऊन १६ दिवस उलटले तरी आश्वासनाची पूर्तता झालेली नाही. मग आंदोलन मागे घेण्याचा आग्रह का धरण्यात आला, असा प्रतिप्रश्न निकम यांनी उपस्थित केला आहे. पालकमंत्र्यांची भेट घेऊन निकम हा सगळा प्रकार त्यांना सांगणार आहेत.

--------------------------------