शहरं
Join us  
Trending Stories
1
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी
2
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
3
IND vs ENG 4th Test Day 4 Stumps : साडे चार तासांत ३७८ चेंडूंचा सामना; KL राहुल-गिल जोडी जमली; पण लढाई अजून नाही संपली!
4
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
5
Shubman Gill Record : गिलनं साधला मोठा डाव! इंग्लंडच्या मैदानात पाक दिग्गजाला 'धोबीपछाड'
6
तेव्हा लोक म्हणाले होते जणू दुसरी ऐश्वर्याच, सलमान खानची ही हिरोईन आता दिसते अशी 
7
एलियन्सचं रहस्यमय अंतराळ यान नोव्हेंबरमध्ये करणार पृथ्वीवर हल्ला, शास्त्रज्ञांना धक्कादायक दावा
8
नवरा बायकोमध्ये तुफान भांडण, पतीच्या डोक्यात घातला हातोडा, हत्येनंतर दार लावलं अन्...
9
Video: बंगळुरूच्या महिला प्रोफेसरचा मराठमोळ्या 'वाजले की बारा' लावणीवर भन्नाट डान्स
10
"आम्ही खूप दुःखी..."; दिराने वहिनीला कुंकू लावलं अन् धबधब्यात घेतली उडी, प्रेमाचा भयंकर शेवट
11
IND vs ENG : जसप्रीत बुमराहचं 'शतक'; मँचेस्टर कसोटीतील न पटण्याजोगी गोष्ट
12
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
13
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
14
"सरकार ही निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचं काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
15
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
16
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
17
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
18
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."
19
VIDEO: अरे देवा... माकडाने ट्रेकरला मध्येच गाठलं, आधी बॅग उचकली, मग पाठीवर चढलं अन् मग...
20
धक्कादायक! या डेटिंग ॲपवरून महिलांचे हजारो फोटो लीक, प्रायव्हसी आली धोक्यात

कोंडीच्या अहवालाची अंमलबजावणी करा

By admin | Updated: April 22, 2017 02:24 IST

शहरातील वाहतूककोंडी सोडवण्यासाठी वाहतूक विभागाने तयार केलेल्या अहवालाची बातमी शुक्रवारी ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध होताच त्याची केडीएमसी, रिक्षाचालक व युनियनचे

डोंबिवली : शहरातील वाहतूककोंडी सोडवण्यासाठी वाहतूक विभागाने तयार केलेल्या अहवालाची बातमी शुक्रवारी ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध होताच त्याची केडीएमसी, रिक्षाचालक व युनियनचे पदाधिकारी आणि विविध संस्थांमध्ये चर्चा झाली. या अहवालाबाबत वाहतूक विभागाने आॅनलाइनद्वारे हरकती-सूचना मागवल्या आहेत. दरम्यान, सर्वसामान्य नागरिकांनी या अहवालाची तातडीने अंमलबजावणी करण्याची मागणी केली आहे.शहरातील रिक्षा, गल्लीबोळात असलेले रिक्षा स्टॅण्ड, बेशिस्त चालक, बेकायदा फेरीवाले, पार्किंग व्यवस्थेचा अभाव यामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूककोंडीत भर पडत असल्याचे वाहतूक विभागाने आपल्या अहवालात म्हटले आहे. या अहवालाबाबत नागरिकांनी www.thanepolice.org या वेबसाइटवर, cp.thane.dcptraffic@mahapolice.gov.in या ई-मेल आयडीवर तसेच ठाणे वाहतूक पोलीस शाखा, तीनहातनाका, ठाणे (प.) येथे लेखी स्वरूपात हरकती-सूचना मांडाव्यात, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे. शहरातील रिक्षा, रिक्षा स्टॅण्ड यावर या अहवालात वाहतूक विभागाने ठपका ठेवल्याने रिक्षा युनियन आणि नगरसेवक मंदार हळबे यांनी या अहवालात त्रुटी असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे त्यात सुधारणा आवश्यक असल्याची अपेक्षा त्यांनी केली. या अहवालाचे कागदी घोडे नाचवणार का, अहवाल केडीएमसी आयुक्तांना सादर केला का, असे प्रश्न नागरिकांनी केले आहेत.शहरात किती रिक्षा स्टॅण्ड वैध आहेत, याची माहिती समितीला आहे का? ती त्यांनी आधी घ्यावी. वास्तव समोर आल्यावर जे निरीक्षण केले, ते दालनात बसून केले की, प्रत्यक्ष फिल्डवर केले, हे स्पष्ट होईल, असे भाजपाप्रणीत रिक्षा युनियनचे अध्यक्ष दत्ता माळेकर म्हणाले. (प्रतिनिधी)वाहतूककोंडीप्रश्नी समितीने नोंदवलेले निरीक्षण योग्य असले, तरी स्थानक परिसरातील कोंडी सोडवण्यासाठी कोणतेही विशेष प्रयत्न झालेले दिसत नाहीत. अनेक रस्त्यांवर दुतर्फा वाहने उभी केली जातात, त्याचेकाय? रिक्षा स्टॅण्डबद्दल तर बोलायची सोय नाही. - विवेक पंडित, संस्थापक, विद्यानिकेतनसमितीच्या अहवालावर डोंबिवलीत जनतादरबार भरवावा. त्यात उघडपणे मत घेऊन अंमलबजावणीबाबत तातडीने निर्णय घ्यावा.- कुशल जोशीपारदर्शक कारभारामुळेच हात दाखवा, रिक्षा थांबवा, अशी बकाल अवस्था आणि जागा तिथे रिक्षा स्टॅण्ड उभे केले जातात. त्या विषयावर काय बोलावे. - योगेश दामले‘लोकमत’च्या पाठपुराव्यामुळे अहवाल तर तयार झाला. नागरिकांनी या अहवालावर आपल्या सूचना नोंदवाव्यात. त्याची तातडीने अंमलबजावणी व्हावी, यासाठी एकत्र येणे आवश्यक आहे.- सागर घोणे, श्रीखंडेवाडी रहिवासी मित्र मंडळवाहतूककोंडीचा विषय ‘लोकमत’ने योग्य पद्धतीने उचलून धरला आहे. त्यात सामाजिक संस्थांनीही सहभाग घ्यायला हवा. अहवालाच्या अंमलबजावणीसाठी स्वाक्षरी अभियान, सभा, बैठका तातडीने व्हायला हव्यात. - प्रवीण दुधे, उपाध्यक्ष, गणेश मंदिर संस्थाननागरिकांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न ‘लोकमत’ने मांडला. वाहतूक विभागाने महापालिकेकडे अहवाल सादर करावा. आयुक्तांकडे पाठपुरावा करून त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याची जबाबदारी एक त्रस्त नागरिक म्हणून माझीही आहे.- रमेश म्हात्रे, सभापती, स्थायी समिती, केडीएमसीशिवसेना नागरिकांच्या बाजूने आहे. अहवालाच्या अंमलबजावणीसाठी पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यासमवेत नागरिकांची बैठक घेणार आहोत.- भाऊसाहेब चौधरी, शहरप्रमुख, शिवसेना, डोंबिवलीअहवालात अनेक त्रुटी असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यासंदर्भातील माझे मत मी वाहतूक विभागाकडे मांडणार आहे. त्यानुसार, त्यात बदल आणि अंमलबजावणी न झाल्यास मी आंदोलनावर ठाम आहे.- मंदार हळबे, नगरसेवकएखाद्या अहवालात महापालिकेवर गंभीर ताशेरे ओढले जात असतील, तर ते योग्य नाही. महापालिकेने तातडीने अंमलबजावणी केलीच पाहिजे. त्यासाठी विरोधी पक्षनेता म्हणून मी आक्रमकपणे जाब विचारेन.- प्रकाश भोईर,विरोधी पक्षनेते, केडीएमसी