शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

पेट्रोल डीलर्सच्या संपाचा ठाण्यात परिणाम; मध्यवर्ती ठिकाणचे दोन पेट्रोल पंप सकाळीच बंद 

By अजित मांडके | Updated: January 2, 2024 13:42 IST

पेट्रोल असलेल्या पंपावर दुचाकी वाहन चालकांची तोबा गर्दी.

अजित मांडके, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: पेट्रोल डिझेलची वाहतुक करणाऱ्या डीलर्सने पुकारलेल्या संपाचा परिणाम मंगळवारी सकाळीच ठाण्यात जाणू लागला. पेट्रोल नसल्याने ठाणे शहरातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या तीन पेट्रोल पंप परिसरातील दोन्ही पेट्रोल पंप सकाळपासूनच काही तासांच्या अंतरावर बंद झाल्याचे पाहण्यास मिळून आले. त्यामुळे इतर पेट्रोलपंपावर वाहन चालकांनी धाव घेतल्याने तेथे विशेष करून दुचाकी वाहन चालकांची तोबा गर्दी झाली होती. तसेच वाहन चालकांनी पेट्रोल गाडी टाकण्यासाठी लांबचलांब रांगा लावण्याचे प्रखरपणे दिसून आले.

शहरातील इतर ठिकाणी असलेल्या पेट्रोल पंप धारकांकडे स्वतःचे पेट्रोल आणणारे वाहने असल्याने त्या पंपावर पेट्रोल उपलब्ध होते. त्या ठिकाणी वाहन चालक गाड्यांच्या टाक्या फुल करताना बाटल्या आणि कॅन मध्ये पेट्रोल नेताना दिसत होते. 

सोमवारी पेट्रोल वाहून नेणाऱ्या डीलर्सने संप पुकारल्याने मंगळवारी सकाळीच तीन पेट्रोल पंप येथील पेट्रोल संपल्याने एक पंप बंद झाला होता. त्यानंतर काही अंतरावर असलेल्या आणखी एक पंप बंद करण्याची वेळ त्या पेट्रोल पंप धारकावर आली. तर जे पेट्रोल बंद झाले होते. त्या पेट्रोल पंपाच्या ठिकाणी ओन्ली डिझेल असे बोर्ड लावण्यात आले होते. तसेच पंपावरील कर्मचारी येणाऱ्या वाहन चालकांना पेट्रोल संपल्याचे सांगताना दिसून आले. जोपर्यंत पेट्रोल आणि डिझेल आहे, तोपर्यंत पंप सुरू राहतील. त्यानंतर मात्र ते बंद करावे लागतील असाचा सूर पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांशी बोलताना दिसून आला. 

काही पेट्रोल पंपावरील पेट्रोल संपले आहे. हे समजल्याने तातडीने गाडी घेऊन पेट्रोल पंपावर धाव घेतली आणि थेट गाडीची टाकी फुल केल्याचे वाहन चालकांकडून सांगण्यात आले. पेट्रोल बाटली आणि कॅनमध्ये

आज पेट्रोल संपल्यावर उद्या पेट्रोल मिळेल की नाही या भीतीने काही वाहन चालक नामी शल्लक लढविताना दिसून आले. कोणी वाहन चालक जवळच गाडी बंद पडली आहे सांगून पेट्रोल बाटली तसेच कॅनमध्ये भरून नेताना दिसून येत होते. तसेच पेट्रोल पंपावर अशाप्रकारे पेट्रोल मिळत असल्याने चालकांनी गर्दी केल्याचे पाहण्यास मिळाले.

टॅग्स :Petrol Pumpपेट्रोल पंप