शहरं
Join us  
Trending Stories
1
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
2
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
3
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
4
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
5
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
6
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
7
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
8
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
9
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
10
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर
11
'निराधार आणि बेजबाबदार'; राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाने सोडले मौन, काय दिले उत्तर?
12
IND vs ENG 5th Test: Gus Atkinson चा 'पंजा'! टीम इंडियानं २० धावांत गमावल्या ४ विकेट्स! अन्...
13
सेबीच्या नियमांना फाटा देऊन शेअर्सची खरेदी-विक्री, पण धोकाही मोठा! 'ग्रे मार्केट'ची Inside Story
14
Shravan Shanivar 2025: शनिवारी कसे करावे अश्वत्थ मारुती पूजन? पिंपळाच्या झाडाचीही पूजा महत्त्वाची!
15
नागरिकांची झोप उडवणाऱ्या चड्डी- बनियान टोळीला पकडण्यात पोलिसांना यश!
16
आशा भोसलेंनी पुण्यातील आलिशान फ्लॅट विकला! एकाच झटक्यात कमावले इतके कोटी, तब्बल ४२ टक्के वाढ
17
कुठल्याही देवावर विश्वास नाही, कुठलाही धर्म मानत नाही, या १० देशांमधील बहुतांश लोक आहेत नास्तिक
18
Viral Video: भल्यामोठ्या अजगराला दुचाकीला बांधून फरफटत नेलं, संतापजनक प्रकार कॅमेऱ्यात रेकॉर्ड!
19
वानखेडे स्टेडियममध्ये सुनील गावसकर, शरद पवार यांचा होणार गौरव, MCA उभारणार पुतळा
20
जुहूच्या समुद्रात दोन अल्पवयीन मुले बुडाली; एकाला वाचवलं, दुसऱ्याचा शोध सुरू!

मीरा भाईंदर मध्ये दीड दिवसांच्या ७ हजार ८७८ श्रीगणेश मूर्तींचे विसर्जन

By धीरज परब | Updated: September 2, 2022 20:54 IST

महापालिकेने विसर्जनाची तर पोलिसांनी बंदोबस्ताची जबाबदारी पार पाडली .

मीरारोड- मीरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रात दिड दिवसांच्या ७ हजार ८७८ श्रीगणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. महापालिकेने विसर्जनाची तर पोलिसांनी बंदोबस्ताची जबाबदारी पार पाडली. 

महापालिकेने तयार केलेल्या ३ कृत्रिम विसर्जन स्थळांवर तसेच नैसर्गिक तलाव, खाडी, समुद्रात महापालिकेने विसर्जनाची व्यवस्था केली आहे . शिवाय मुर्ती स्वीकृती केंद्र उभारली आहे.  आमदार गीता जैन , महानगरपालिका आयुक्त दिलीप ढोले, उपायुक्त मारुती गायकवाड व रवी पवार आदींनी शहरातील ठराविक विसर्जन ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन विसर्जन व्यवस्थेची पाहणी केली. 

प्रभाग समिती १ मध्ये ३०२, समिती २ मध्ये ७९६,  समिती ३ मध्ये १६७३ , समिती ४ मध्ये २७३८,  समिती ५ मध्ये ८२ तर प्रभाग समिती ६ मध्ये २२८७ श्रीगणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले.  विसर्जनस्थळांवर सुरक्षेच्या दृष्टीने बांबूंचे बॅरेकेटींग करण्यात आले होते. अग्निशमन सेवक, महानगरपालिका स्वयंसेवक यांच्यासह वैद्यकीय आरोग्य व सार्वजनिक आरोग्य सेवेतील कर्मचारी कार्यरत होते. 

सर्व विसर्जन स्थळांवर कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीकोनातून सीसीटीव्ही यंत्रणा बसवण्यात आली आहे . निर्माल्य , अन्य कचरा आदी [पाण्यात न टाकता किनाऱ्यावरील कलश मध्ये टाकण्याचे आवाहन पालिकेने केले आहे . तर ध्वनी मर्यादेचे पालन न करणाऱ्यांवर कारवाईची मागणी होत आहे. विसर्जन मुळे सार्वजनिक परिवहन उपक्रमाच्या भाईंदर रेल्वे स्थानक पर्यंतच्या बस बंद करण्यात आल्याने मोठ्या संख्येने लोकांचे हाल झाले . लोकांना नाहक पायपीट करावी लागली वा रिक्षाचे जास्त भाडे मोजावे लागले . 

टॅग्स :thaneठाणेGanesh Mahotsavगणेशोत्सव