शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

‘अमृत’ योजना २७ गावांमध्ये तातडीने कार्यान्वित करा - एकनाथ शिंदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2018 06:21 IST

कल्याण ग्रामीण मतदारसंघ हा शिवसेनेचा गड आहे. डोंबिवलीतील २७ गावांचा विकास व्हावा, यासाठी शिवसेना साडेतीन वर्षे सातत्याने प्रयत्न करत आहे. या भागांतील पाणीसमस्या तातडीने सोडवण्यासाठी अमृत योजना कार्यान्वित करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले आहेत. लवकरच या कामाला सुरुवात होईल, असा विश्वास पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.

डोंबिवली -  कल्याण ग्रामीण मतदारसंघ हा शिवसेनेचा गड आहे. डोंबिवलीतील २७ गावांचा विकास व्हावा, यासाठी शिवसेना साडेतीन वर्षे सातत्याने प्रयत्न करत आहे. या भागांतील पाणीसमस्या तातडीने सोडवण्यासाठी अमृत योजना कार्यान्वित करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले आहेत. लवकरच या कामाला सुरुवात होईल, असा विश्वास पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.कल्याण ग्रामीणचे शिवसेनेचे आमदार सुभाष भोईर यांच्या मानपाडा येथील जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी झालेल्या जाहीर सभेत शिंदे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, राजन विचारे, आमदार भोईर, महापौर राजेंद्र देवळेकर, सभागृह नेते राजेश मोरे, गटनेते रमेश जाधव, कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, उपजिल्हाप्रमुख सदानंद थरवळ, युवासेनेचे सचिव पूर्वेश सरनाईक आदी मान्यवर उपस्थित होते.शिंदे म्हणाले, लोकसभा व विधानसभा निवडणुकांत ग्रामीण भागातून शिवसेनेला भरघोस मतदान झाले आहे. काही राजकीय पक्षांची कार्यालये केवळ निवडणुकीसाठी असतात. शिवसेना मात्र बाराही महिने कार्यालयातून जनतेचे प्रश्न सोडवण्याचे काम करते. केडीएमसीतील २७ गावांचे प्रश्न सोडवण्यासाठी खासदार डॉ. शिंदे, आमदार भोईर सातत्याने प्रयत्न करत असतात. या भागाच्या विकासासाठी शिवसेनेने अर्थसंकल्पात ५५० कोटींची तरतूद केली आहे. या भागातील रस्ते, अंतर्गत रस्ते यांची कामे तसेच अमृत योजना अशा विविध कामांना सुरुवात केली आहे. यामुळे नजीकच्या काळात या भागाचा चेहरामोहरा बदलेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.कल्याण-डोंबिवलीतही क्लस्टर योजना मंजूर झाली पाहिजे. या योजनेला १४ वर्षे पूर्ण झाली आहेत. सुरुवातीला त्याला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी विरोध केला होता. बेकायदा इमारतींना क्लस्टर योजना कशी लागू करता येईल, असा प्रश्न विचारला जातो. अशा बेकायदा इमारतींतही नागरिक राहतात, अशी भूमिका शिवसेनेने घेतली होती. त्यामुळे शिवसेनेने क्लस्टर योजना आणली. या योजनेत अनेक त्रुटी होत्या. त्याही आता दूर झाल्या आहेत. कल्याण-डोंबिवलीतील धोकादायक इमारतींसाठीही क्लस्टर मंजूर केले पाहिजे, असेही शिंदे म्हणाले.आमदार भोईर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. या वेळी डॉ. शिंदे आणि महापौर देवळेकर यांची भाषणे झाली.‘विरोधी पक्ष काहीच करत नाहीत’राज्यात शिवसेना सत्तेत असूनही विरोध का करते, अशी टीका केली जाते. याचा समाचार घेताना शिंदे म्हणाले, महाराष्ट्रातील विरोधी पक्ष काही करत नाही व विरोधी पक्ष कमकुवत आहे.त्यामुळेच शिवसेनेला विरोधी भूमिका घ्यावी लागते. शिवसेनेची बांधीलकी जनतेशी आहे. जनतेच्या प्रश्नासाठी शिवसेना सरकारमध्ये असूनही रस्त्यावर उतरते आहे. शिवसेना सत्तेसाठी लाचार नाही, असेही ते या वेळी म्हणाले.डोंबिवलीत घरच्यासारखे वाटते - अंकुश चौधरीआमदार भोईर यांच्या जनसंपर्क कार्यालयाला शुभेच्छा देण्यासाठी प्रसिद्ध अभिनेता अंकुश चौधरी व महेश मांजरेकर यांनी उपस्थिती लावली होती. या वेळी चौधरी म्हणाले, डोंबिवलीत मी वारंवार येतो. कारण, इकडे आलो की, मला घरच्यासारखे वाटते.एका गाण्यावर त्यांनी नृत्य करून रसिकांना खूश केले. आमदार भोईर यांचा जनसंपर्क दांडगा असून या कार्यालयामुळे अधिक संपर्क वाढेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेkdmcकल्याण डोंबिवली महापालिका