शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
4
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
5
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
6
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
7
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
8
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
9
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
10
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
11
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
12
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
13
आयोग नव्हे, मतदारच राजा !
14
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
15
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
16
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
17
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
18
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
19
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
20
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले

कल्याण-डोंबिवलीतील खड्डे त्वरित बुजवा; वकिलाचे केडीएमसी आयुक्तांना पत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2019 00:59 IST

अन्यथा कायदेशीर नोटीस पाठवणार

कल्याण : कल्याण-डोंबिवलीतील रस्त्यांना पडलेले खड्डे तातडीने बुजविण्यासंदर्भात अ‍ॅड. संजय मिश्रा यांनी आयुक्त गोविंद बोडके यांना एक पत्र पाठविले आहे. मात्र, त्याची दखल न घेतल्यास खड्डे बुजविण्याप्रकरणी कायदेशीर नोटीस पाठविण्यात येईल, असे मिश्रा यांनी सांगितले.

कल्याण पूर्वेतील काटेमानिवली परिसरात मिश्रा राहतात. आयुक्तांना दिलेल्या पत्रात त्यांनी म्हटले आहे की, महापालिका हद्दीतील सगळ्याच रस्त्यांची चाळण झाली आहे. खड्ड्यांमुळे अपघात होऊन नागरिकांचा जीव जाऊ शकतो. असे असताना महापालिका प्रशासन खड्डे बुजविण्याकडे दुर्लक्ष करत आहे. महापालिका दरवर्षी नागरिकांकडून मालमत्ता करापोटी कोट्यवधींची वसुली करते. गेल्याच वर्षी मालमत्ता करापोटी ३५० कोटींची वसुली केली होती. यंदा मालमत्ता कराच्या वसुलीचे लक्ष्य ४५० कोटी रुपये आहे. नागरिकांनी मालमत्ता कर न भरल्यास महापालिका प्रशासनाकडून जप्ती आणि लिलावाची कारवाई केली जाते. तसेच मालमत्ता कराच्या थकबाकीचा धनादेश वेळेवर न वटल्यास महापालिका संबंधित मालमत्ताधारकावर गुन्हा दाखल करते. ही कारवाई करताना महापालिका जशी तत्परता दाखविते तशी खड्डे बुजवण्यासाठी दाखवली जात नाही. या दिरंगाई व बेपर्वा केल्याप्रकरणी प्रशासनाच्या विरोधात गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई का करू नये. महापालिकाही कारवाईस पात्र आहे. आयुक्तांना केवळ पत्राद्वारे ही बाब निदर्शनास आणून दिली असली तरी खड्डे न बुजविल्यास महापालिकेच्या विरोधात कायदेशीर नोटीस काढली जाईल. त्यानंतर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे मिश्रा यांनी सूचित केले आहे.