शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

दिव्यांग पेन्शन तात्काळ जमा करा, आमदार रविंद्र चव्हाण यांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2020 23:33 IST

डोंबिवली: महानगरपालिकेचा भोंगळ कारभार नेहमी चव्हाट्यावर येत असतो. त्याचाच एक प्रकार पालिका क्षेत्रातील दिव्यांग व्यक्तींच्या बाबतीत घडला आहे. गेल्या ...

डोंबिवली: महानगरपालिकेचा भोंगळ कारभार नेहमी चव्हाट्यावर येत असतो. त्याचाच एक प्रकार पालिका क्षेत्रातील दिव्यांग व्यक्तींच्या बाबतीत घडला आहे. गेल्या दीड वर्षांपासून महापालिका क्षेत्रातील सुमारे ४००-४५० दिव्यांग व्यक्तींना दरमहा पेन्शन दिले जाते. दिव्यांग व्यक्तींना नोव्हेंबर २०१९ पर्यंतचे पेन्शन मिळाले असून त्यांना त्यानंतर पाच महिने झाले तरी पेन्शन मिळालेली नाही. आमदार रविंद्र चव्हाण यांना दिव्यांग व्यक्तीनी साकडे घालून यात तात्काळ लक्ष देण्याची मागणी केल्याने हे प्रकरण उजेडात आले. 

या संदर्भात आमदार चव्हाण यांनी केडीएमसी आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी यांना सोमवारी पत्र लिहून तात्काळ पेन्शन अदा करण्याची मागणी केली . महापालिका क्षेत्रात जवळपास ४००-४५० दिव्यांग पेन्शनधारक असून मध्यंतरी त्या संबधित फाईलवर पालिका प्रशासनाने  अकार्यक्षमतेचा शेरा मारला होता पण महासभेच्या ठरवानंतर सदर अकार्यक्षमतेची अट रद्द करण्यात आलेली होती. 

चव्हाण यांनी सांगितले की लॉक डाऊनच्या सद्य परिस्थितीत दिव्यांग व्यक्तींची उपासमार होत असल्याच्या लेखी तक्रारी काही दिव्यांग व्यक्तींनी माझ्या नजरेस आणून दिल्या. याबाबत महापालिकेने स्पष्ट निर्णय घेतला असताना हेतुपुरस्सर दिव्यांग व्यक्तींना पेन्शन देण्यात येत नसल्याचे दिसून आले त्यामुळे यादीतील दिव्यांग व्यक्तींच्या बँक खात्यावर तात्काळ पेन्शनची रक्कम अदा करण्याची मागणी केली.