शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

डॉ. कलामांच्या घरी कल्पकता केंद्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2017 00:28 IST

ठाण्यातील चिल्ड्रन टेक सेंटरच्या वतीने दिवंगत माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या रामेश्वरम येथील निवासस्थानी आणि त्यांच्या शाळेत डॉ. अब्दुल कलाम कल्पकता केंद्र गुरुवारपासून सुरू करण्यात येणार आहे.

ठाणे : ठाण्यातील चिल्ड्रन टेक सेंटरच्या वतीने दिवंगत माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या रामेश्वरम येथील निवासस्थानी आणि त्यांच्या शाळेत डॉ. अब्दुल कलाम कल्पकता केंद्र गुरुवारपासून सुरू करण्यात येणार आहे. डॉ. कलाम इंटरनॅशनल फाउंडेशनच्या वतीने या उपक्रमाकरिता पुढाकार घेण्यात आला आहे. यापूर्वी ठाण्यातील कचराळी तलाव येथे गेल्या गतवर्षी डॉ. कलाम कल्पकता केंद्र सुरू करण्यात आले आहे.या केंद्राची माहिती मिळाल्यावर त्याची पाहणी करण्यासाठी डॉ. कलाम इंटरनॅशनल फाउंडेशनच्या वैज्ञानिकांनी या केंद्राला भेट दिली. कसलेही स्मारक किंवा पुतळा न उभारता कल्पकता केंद्राच्या माध्यमातून डॉ. कलामांना वाहिलेली श्रद्धांजली ही संकल्पना त्यांना खूप आवडली आणि अशाच प्रकारचे केंद्र रामेश्वरम येथे कलमांच्या घरी आणि शाळेत उभारावे, असे त्यांनी सांगितले. त्यानंतर, दोन महिन्यांत मिलिंद चौधरी आणि पुरुषोत्तम पाचपांडे यांच्या प्रयत्नाने केंद्राची निर्मिती करण्यात आली. ज्येष्ठ वैज्ञानिक आणि माजी राष्ट्रपती यांचे घर पाहण्याकरिता देशभरातील शालेय विद्यार्थी रामेश्वरमला येतात. त्यांना विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या संकल्पना अनुभवता याव्यात, यासाठी कल्पकता केंद्राचा उपयोग होईल, असे पाचपांडे यांनी सांगितले. या केंद्राच्या माध्यमातून चौथी ते दहावीच्या शालेय विद्यार्थ्यांना आठवड्यातून दोन तास विज्ञान, तंत्रज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स, रोबोटिक्स अशा विविध विषयांतील तीन हजारांहून अधिक प्रयोग स्वत:च्या हाताने करण्याची संधी उपलब्ध होत आहे. एवढेच नव्हे तर विद्यार्थ्यांनी केलेले काही प्रयोग हे त्यांना त्यांच्या घरी घेऊन जायला मिळतात.