शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

मी नवखा उमेदवार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2019 01:54 IST

बाबाजी पाटील : ३३ वर्षांनी स्थानिकाला संधी

कल्याण : कल्याण लोकसभा निवडणुकीतील मी नवखा उमेदवार असल्याचा जो प्रचार सुरू आहे, तो चुकीचा आहे. माझ्यासाठी लोकसभा निवडणूक नवीन असली, तरी मी स्थानिक आहे, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार बाबाजी पाटील यांनी विरोधकांना लगावला. तब्बल ३३ वर्षांनंतर या लोकसभा मतदारसंघाला स्थानिक उमेदवार मिळाला असून यावेळी स्थानिक उमेदवारालाच मतदारांकडून न्याय मिळेल, असा दावाही त्यांनी पत्रकार परिषदेत केला.

पाटील म्हणाले की, सहकार क्षेत्रात गेल्या ११ ते १२ वर्षांपासून संचालक आहे. तीन वर्षे सहकारी बँकेचा चेअरमन राहिलो आहे. २००८ ते २०१४ या काळात शिक्षण मंडळ सदस्य म्हणून, तर सध्या ठाणे महापालिकेत प्रभाग क्रमांक २९ मधून नगरसेवक म्हणून निवडून आलो आहे. लोकसभेसाठी नवीन चेहरा असलो, तरी सामाजिक कार्याचा आणि येथील स्थानिक प्रश्नांची मला चांगली जाण आहे.मी नवखा असल्याचा जो माझ्याविरोधात प्रचार सुरू आहे, तो चुकीचा आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत डॉ. श्रीकांत शिंदे हे देखील नवखेच होते. मात्र, त्यांना मतदारांनी स्वीकारले होते. यावेळी स्थानिक उमेदवार म्हणून मलाही न्याय मिळेल, असे पाटील म्हणाले. भूमिपुत्र असल्याने आगरी-कोळी समाज पाठीशी राहील, असा विश्वास व्यक्त करतानाच इतरही समाज आमच्यासाठी महत्त्वाचा असल्याचे त्यांनी सांगितले.

नेवाळी आंदोलन, २७ गावे वगळण्याचा मुद्दा स्थानिक जनता विसरणार नाही. या प्रकरणांमध्ये सरकारने पूर्णपणे दुर्लक्ष केले. गेल्या पाच वर्षांत सरकारने आश्वासने दिली, पण पूर्तता केली नाही.सरकारच्या विरोधात असलेला स्थानिकांचा रोष दि. २९ एप्रिलच्या मतदानातून दिसून येईल, असेही पाटील म्हणाले. मनसेच्या मतांचा आपल्याला फायदा होईल, असा दावाही त्यांनी केला. यावेळी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे स्थानिक नेते कॉ. काळू कोमास्कर हे देखील उपस्थित होते.शरद पवार २६ एप्रिलला कल्याण ग्रामीणमध्येराष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांची सभा दि. २६ एप्रिल रोजी प्रीमिअर कॉलनी ग्राउंडवर होणार असल्याची माहिती पाटील यांनी दिली.