शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

डोंबिवलीतील बेकायदा बांधकामे रोखण्यासाठी प्रशासनाकडून सक्त आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2018 22:08 IST

मोठागाव, कोपरगाव, कुंभारखाणपाडा, देवीचा पाडा, सत्यवान चौक, गरीबाचा वाडा, आनंद नगर, जुनी डोंबिवली आदी भागामध्ये मोठय़ा प्रमाणावर बेकायदा चाळी आणि इमारती उभ्या राहत आहेत.

डोंबिवली : कल्याण-डोंबिवली शहरे, 27 गावांमध्ये सर्रासपणे सुरू असलेल्या बेकायदा बांधकामांवर महापालिका प्रशासनाचा अंकुश राहिलेला नाही. सत्ताधाऱ्यांच्या आदेशांना प्रशासन केराची टोपली दाखवत असल्याने अशा बांधकामांचे इमले उभे राहत आहेत. डोंबिवली पश्चिमेतील ‘ह’ प्रभागांतही अशा बांधकामांचे पेव फुटले आहे. ही बांधकामे त्वरित जमीनदोस्त करावीत, असे पत्र ‘ह’ प्रभाग समिती सभापती वृषाली रणजीत जोशी यांनीही बेकायदा बांधकामविरोधी विभागाचे उपायुक्त यांना मार्चमध्ये दिले आहे. परंतु, प्रशासनाने कोणतीही कार्यवाही केलेली नाही, असे जोशी यांनी सांगितले.‘ह’ प्रभागातील मोठागाव, कोपरगाव, कुंभारखाणपाडा, देवीचा पाडा, सत्यवान चौक, गरीबाचा वाडा, आनंद नगर, जुनी डोंबिवली आदी भागामध्ये मोठय़ा प्रमाणावर बेकायदा चाळी आणि इमारती उभ्या राहत आहेत. ही बांधकामे तातडीने जमीनदोस्त करावीत. अशा बांधकामांबाबत तक्रार करूनही ती सुरू राहिल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी महापालिका अधिकाऱ्यांची असेल, असा इशाराही जोशी यांनी पत्रत दिला आहे. केवळ ‘ह’ प्रभाग समितीच नव्हे तर एकंदरीतच प्रभाग समितीच्या सभापतींना कोणतेही विशेष अधिकार नाहीत. हे पद केवळ नावाला आहे. अधिकार नसतील तर असे पद हवेच कशाला, असा सवाल रणजित जोशी यांनी केला. बेकायदा बांधकामांबरोबरच प्रभागातील स्वच्छता, भटक्या कुत्र्यांचा प्रश्न, आरोग्य, रस्ते, पाणीपुरवठा आदी विविध समस्यांबाबत अधिका:यांना पत्रे दिली जातात. मात्र, ते त्यांना केराची टोपली दाखवत असतील तर त्याचा अर्थ काय?  सभापतींनी दिलेल्या पत्रंची, सूचनांची दखल तेवढय़ाच गांभीर्याने घेणो आवश्यक आहे, पण तसे होत नाही. मार्चमध्ये पत्र दिले, त्यानंतर सातत्याने यावर चर्चा झाली. मात्र, कोणतीही कार्यवाही झाली नाही. हा दोन महिन्यांचा अनुभव असल्याचे ते म्हणाले. 

टॅग्स :Enchroachmentअतिक्रमणdombivaliडोंबिवली