शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडीतही बेकायदा हुक्का पार्लरचा सुळसुळाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 00:23 IST

या पार्लरमुळे शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी या हुक्का पार्लरमध्ये जाऊन नशेचे शिकार होत आहेत. या नशेखोरीमुळे शहरात चोरी व गुन्ह्यांचे प्रमाण मोठ्या संख्येने वाढत आहे.

नितीन पंडितलोकमत न्यूज नेटवर्क भिवंडी : भिवंडी शहर व ग्रामीण भागात विविध ढाबे, हॉटेल, कॉफी हाऊस, यामध्ये मोठ्या प्रमाणात हुक्का पार्लर सुरू असल्याच्या अनेक तक्रारी पोलीस प्रशासनाकडे येत असतात. मात्र, त्या-त्या विभागाच्या स्थानिक पोलिसांच्या आशीर्वादाने व राजकीय वरदहस्तांमुळे शहरासह ग्रामीण भागात अनेक ठिकाणी हुक्का पार्लर मोठ्या प्रमाणात फोफावले आहेत. या पार्लरमुळे शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी या हुक्का पार्लरमध्ये जाऊन नशेचे शिकार होत आहेत. या नशेखोरीमुळे शहरात चोरी व गुन्ह्यांचे प्रमाण मोठ्या संख्येने वाढत आहे.भिवंडी पोलीस उपायुक्त परिमंडळ २ अंर्तगत येणारे पोलीस स्टेशन कोनगांव, नारपोली, निजामपुरा, शांतीनगर, शहर पोलीस ठाणे व भोईवाडा पोलीस स्टेशन, तसेच तालुका पोलीस ठाण्याच्या अंर्तगत ठिकठिकाणी बेकायदा हुक्का पार्लर मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. ग्रामीण भागात तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील महामार्गांवर असलेले ढाबे व हॉटेलमध्ये सर्रास हुक्का पार्लर सुरू केल्याची उदाहरणे समोर आहेत. विशेष म्हणजे नागरिकांच्या वाढत्या तक्रारींमुळे या अवैध हुक्का पार्लरवर स्थानिक पोलिसांकडून थातुरमातुर कारवाई करण्यात येते. मात्र, या हुक्का पार्लरवर कायमस्वरूपी बंदी घातल्याचे सहसा पाहायला मिळत नाही, उलट हुक्का पार्लरचे चालक मालक नाव आणि ठिकाण बदलून पुन्हा पार्लर सुरू करताना नेहमीच पाहायला मिळते.

सरसकट कारवाईची मागणीमागील आठवड्यात भिवंडी गुन्हे शाखेच्या पथकाने खाडीपार परिसरात जॉय हुक्का पार्लरवर रात्रीच्या सुमारास छापा टाकून जवळपास २५ तरुणांना ताब्यात घेतले होते. त्यावेळी २५ तरुण हुक्क्याच्या नशेमध्ये धुंद असल्याचे दिसून आले. या प्रकरणी निजमपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून, या सर्वांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर फैजदारी कारवाई करण्यात आली आहे. हुक्का पार्लरमध्ये एवढ्या मोठ्या संख्येने तरुणतरुणी जात असल्याने, पालकांमध्ये चिंता पसरली आहे. मात्र, या हुक्का पार्लरवर सरसकट कारवाई होत नसल्याने पालकांनी संताप व्यक्त केला.