शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

अवैध बांधकामांचा अध्यादेश अजेंड्यावर

By admin | Updated: January 26, 2017 03:09 IST

उल्हासनगरची अवैध बांधकामे नियमित करण्यासाठी राज्य शासनाने विशेष अध्यादेश काढला. पण तांत्रिक कारणामुळे त्याची प्रक्रिया ठप्प झाली.

सदानंद नाईक / उल्हासनगरउल्हासनगरची अवैध बांधकामे नियमित करण्यासाठी राज्य शासनाने विशेष अध्यादेश काढला. पण तांत्रिक कारणामुळे त्याची प्रक्रिया ठप्प झाली. पालिका निवडणुकीत प्रत्येक पक्षाने या अध्यादेशाला गती देण्याचा मुद्दा आपल्या अजेंड्यावर घेतला आहे. त्यामुळे बांधकामे नियमित होतील. पालिकेला उत्पन्न मिळेल आणि त्यातील अनेक इमारतींच्या पुनर्बांधणीचा मुद्दाही निकाली निघेल. उल्हासनगरातील ८५५ अवैध बांधकामे पाडण्याचे आदेश न्यायालयाने दिल्यानंतर शहरात एकच हंडकप झाला होता. हजारो जण बेघर होतील, असा मुद्दा उपस्थित झाला. न्यायालयाच्या आदेशानुसार पालिकेने प्रचंड पोलीस बंदोबस्तात पाडकाम सुरू करताच नागरीक रस्त्यावर उतरले. त्यामुळे तत्कालीन राज्य सरकारने उल्हासनगर हे विस्थापित सिंधी समाजाचे शहर असल्याचे सांगून त्या शहरासाठी २००६ साली विशेष अध्यादेश काढला. शासनाच्या आदेशानुसार जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली प्रभाग समितीनिहाय तज्ज्ञ समितीची स्थापना केली. पालिकेकडे वैध-अवैध बांधकामांची यादी नसल्याने सरसकट सर्वच मालमत्ताधारकांना नोटिसा पाठवून अवैध बांधकामे नियमित करण्यासाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन केले. त्यानंतर २२ हजारांपेक्षा जास्त प्रस्ताव आले. त्यांची छाननी झाली. मात्र फक्त १०० बांधकामे नियमित होऊन दंडापोटी सात कोटींचे उत्पन्न पालिकेला मिळाले. नंतर तांत्रिक अडचणी उभ्या राहिल्या. जिल्हाधिकारी व पालिकेच्या दुर्लक्षामुळे अध्यादेशाची प्रक्रिया ठप्प झाली.राज्य सरकार व महापालिकेने अध्यादेशाच्या अंमलबजावणीसाठी तत्काळ विशेष अधिकाऱ्यांची नेमणूक केली असती तर हजारो बांधकामे नियमित होऊन पालिकेला हजार कोटींपेक्षा जास्त उत्पन्न मिळाले असते. शिवसेना-भाजप, रिपाइं व साई पक्षाची सत्ता असताना त्यांनी या प्रकरणात काहीही केले नाही. आता मात्र पालिका निवडणुकीच्या काळात सर्वच पक्ष अध्यादेशाची प्रक्रिया सुरू करण्याचे आश्वासन देणार आहेत. तसेच इमारतींचा दंड कमी करू, असेही आश्वासन देण्याच्या हालचाली सुरू आहेत.