शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

...पण गळतीकडे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2018 03:10 IST

या चौकात नेहमीच वर्दळ असते. येथेच वाहतूक विभागाचे कार्यालय आहे. २५ दिवसांपूर्वी येथे जलवाहिनी टाकण्यात आली. मात्र, तिला गळती लागल्याने रस्त्याच्या अंतर्गत भागातून पाणी बाहेर पडून मोठमोठे खड्डे तयार झाले आहेत.

कल्याण : पूर्वेकडील कोळसेवाडी चक्कीनाका भागातील चौकात नवीन जलवाहिनी टाकण्याचे काम काही दिवसांपूर्वी करण्यात आले होते. परंतु, या जलवाहिनीला गळती लागल्याने येथे सर्वत्र पाणीचपाणी होऊन मोठे खड्डे निर्माण झाले आहेत. याकडे केडीएमसीचे पुरते दुर्लक्ष झाल्याने सध्या येथे अपघातही घडत आहेत. या पार्श्वभूमीवर कोळसेवाडी वाहतूक पोलीस उपविभागाच्या वतीने महापालिकेकडे पत्रव्यवहार करून तातडीने गळक्या जलवाहिनीच्या दुरुस्तीची मागणी केली आहे.पूर्वेकडील चक्कीनाका चौक परिसर हा कल्याण, उल्हासनगर, डोंबिवली या शहरांकडून हाजीमलंग रोडकडे जाणारा आणि येणारा मुख्य रस्ता आहे. त्यामुळे या चौकात नेहमीच वर्दळ असते. येथेच वाहतूक विभागाचे कार्यालय आहे. २५ दिवसांपूर्वी येथे जलवाहिनी टाकण्यात आली. मात्र, तिला गळती लागल्याने रस्त्याच्या अंतर्गत भागातून पाणी बाहेर पडून मोठमोठे खड्डे तयार झाले आहेत. या खड्ड्यांमध्ये पाणी साठते आहे. शिवाय, या खड्ड्यांची खोली किती आहे, याचा अंदाज वाहनचालकांना येत नाही. यामुळे अपघातही घडत आहेत.एकीकडे शहरात पाणीकपात लागू असताना दुसरीकडे अशा गळतीच्या माध्यमातून होत असलेली पाण्याची नासाडी हा चर्चेचा विषय आहे. दरम्यान, कोळसेवाडी भागातील शहर वाहतूक उपशाखा विभागाचे एस.एन. जाधव यांनी केडीएमसीच्या पाणीपुरवठा विभागाला पत्र पाठवून याकडे लक्ष वेधले आहे.अपघात घडल्यास जबाबदारी महापालिकेचीजलवाहिनीची दुरुस्ती आणि खड्डे भरण्याची कार्यवाही लवकरात लवकर पार पाडावी, अन्यथा भविष्यात अपघात घडल्यास याची सर्वस्वी जबाबदारी महापालिकेची राहील, असेही या पत्रात नमूद करण्यात आले आहे. बऱ्याच ठिकाणी पाण्याच्या व्हॉल्व्हचे लिकेज होऊन रस्त्यावर पाणी आल्याकडेही लक्ष वेधण्यात आले आहे.यासंदर्भात ‘लोकमत’ने पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता राजीव पाठक यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षा