शहरं
Join us  
Trending Stories
1
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
2
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
3
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
4
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
5
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
6
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
7
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
8
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
9
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
10
'या' देशात राहातात सर्वाधिक लिव्ह-इन रिलेशनशिप जोडपी, भारतात हा ट्रेंड किती?
11
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
12
'एकाच शॉटमध्ये दोन पुरुषांसोबत टॉपलेस सीन केला अन्...', मराठी अभिनेत्रीचा खुलासा
13
Tarot Card: पुढचा सप्ताह, वेगवान घडामोडींचा; नक्की काय काय घडणार? वाचा टॅरो भविष्य
14
रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना
15
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
16
४००० कोटींच्या 'रामायण'साठी रणबीर कपूरने 'या दिग्गज गायकाचा' बायोपिक सोडला, अनुराग बसू म्हणाले..
17
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
18
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
19
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
20
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स

आरक्षण मिळाल्यास मुख्यमंत्र्यांना डाेक्यावर घेऊन नाचू: मनोज जरांगे पाटील

By जितेंद्र कालेकर | Updated: November 21, 2023 18:30 IST

"आम्ही शांततेतेचे आव्हान करतोय, तर आमच्यावरच गुन्हे दाखल करताय..."

जितेंद्र कालेकर, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी मराठा कार्यकर्ते हे रात्रंदिवस मेहनत घेत आहेत. आरक्षणाच्या मागणीसाठी हा समाज आपली सर्व कामे सोडून येत आहे. आम्ही शांततेचे आवाहन करीत आहे. तरीही आमच्यावरच गुन्हे दाखल होत आहेत. आता तुम्ही कितीही गुन्हे दाखल केले तरी आता आम्ही घाबरणार नाही. ३२ लाख मराठयांच्या कुणबी नोंदी सापडल्यामुळे आता २४ डिसेंबरपर्यंत मराठयांना मुख्यमंत्र्यांनी आरक्षण द्यायलाच हवे, अशी आग्रही मागणी सकल मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी ठाण्यातील पत्रकार परिषदेत  मंगळवारी केली.

ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे मराठा समाजाला मार्गदर्शन करण्यासाठी जरांंगे पाटील यांची मंगळवारी दुपारी सभा पार पडली. या सभेनंतर पत्रकार परिषदेत त्यांनी ही मागणी केली. तत्पूर्वी, सभेमध्ये मराठा समाजाला मार्गदर्शन करतांना ते म्हणाले, ठाणे हे मुख्यमंत्र्यांचे शहर आहे. ठाण्यात आलाे तरी आपण काही घाबरत नाही. मराठा समाजाला मुख्यमंत्र्यांकडून अपेक्षा आहेत. त्यांनी आरक्षण दिले तर समाज बांधव त्यांना डोक्यावर घेउन  नाचतील. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी वेगळे विशेष अधिवेशन घेण्यापेक्षा योगायोगाने ७ ते २२ डिसेंबर या काळात विधानसभेचे अधिवेशन आहे. सरकारने आरक्षणाबाबतचा पहिला अहवाल स्वीकारला आहेच. आता मराठा कुणबी नोंदीचा दुसरा अहवाल स्वीकारुन २२ ते २४ डिसेंबरपर्यंत आरक्षण द्यावे. अन्यथा २५ डिसेंबरपासून आंदोलनाची दिशा ठरवली जाईल. ते आंदोलन सरकारला झेपणारे नसेल. त्याचवेळी समाजानंही एकजुट ठेवावी. मराठे हटणार नाहीत. आरक्षणाशिवाय, एक इंचही माघार घेणार नाही. जीव गेला तरी ही माघार घेतली जाणार नाही, असा स्पष्ट इशाराच जरांगे पाटील यांनी यावेळी राज्य सरकारला दिला. हे आंदोलन मराठयांच्या न्यायासाठी असून सरकारच्या समन्वयासाठी नाही. पद, पैसा आणि खूर्चीचा मोह आपल्याला नाही. मराठा समाजासाठी इंच भरही नियत ढळू दिली जाणार नाही. आरक्षण देऊन मराठयांच्या मुलांच्या चेहऱ्यावर  हसू आणि आनंद पहायचा आहे. त्यामुळे कोणीही गट तोडू नका, राजकारण करु नका, असा सल्लाही त्यांनी यावेळी आपल्या समाजबांधवांना दिला.

दरम्यान, गडकरी रंगायतनच्या हिरवळीवर आयोजित पत्रकार परिषदेत ते म्हणाले, छगन भुजबळांचे विचार तसेच म्हणुन ते असेच वक्तव्य करीत आहेत. त्यांचा बोलवतां धनी कोणी नाही, असं वाटत होतं पण एवढं बोलून त्यांच्यावर कारवाई होत नाही म्हणजे आता शंका येते त्यांच्या पाठिशी कोणी आहे का? आम्ही कधी बोललो का ओबीसींना आरक्षण का दिले. भुजबळांनी मराठा आरक्षणाला विरोध केला म्हणुन आम्ही त्यांना विरोध केला. आम्हाला ५० टक्क्यांच्या आत ओबीसी आरक्षण पाहिजे, अशी आग्रही मागणी त्यांनी यावेळी केली.

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलthaneठाणे