शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

तंत्रज्ञानामुळे जगणे बदलले तर गाणे ही बदलणारच - आशुतोष जावडेकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2017 21:51 IST

आपले जगणे तंत्रज्ञानामुळे इतके बदलले आहे तर गाणे ही बदलणारच. ही वस्तुस्थिती आपण स्वीकारली पाहिजे. जुन्या काळातील संगीत हे चांगले होते. हे विधान मला पटत नाही.

ठाणे : आपले जगणे तंत्रज्ञानामुळे इतके बदलले आहे तर गाणे ही बदलणारच. ही वस्तुस्थिती आपण स्वीकारली पाहिजे. जुन्या काळातील संगीत हे चांगले होते. हे विधान मला पटत नाही. आताच्या काळात अत्यंत सुमार ते आशयघन अशी गाणी आढळतात असे वक्तव्य लेखक आशुतोष जावडेकर यांनी ठाण्यात केले.      मॅजेस्टिक गप्पाचे शेवटचे पुष्प सोमवारी गुंफण्यात आले. सावरकर वाचनालय येथे हा कार्यक्रम पार पडला. यावेळी जावडेकर यांच्या सांगतिक गप्पांचा कार्यक्रम रंगला. सिद्धार्थ केळकर यांनी त्यांची मुलाखत घेतली. आपल्या संगीत प्रवास उलगडताना जावडेकर म्हणाले की, मला गाण्याचे अंग उपजत होते. एकच अंग असते तर मी पं. आशुतोष जावडेकर असतो. माझ्या आत एक आशुतोष आहे, जो शब्दांचा लोभी आणि दुसरा आशुतोष आहे जो सुरांचा लोभी आहे. शब्द - स्वर हे दूरचे नातेवाईक नाहीत.  उत्तम गाण्यासाठी जगण्याचा रियाज असावा लागतो. ते अनेक गायकांना नाही. ऐकणो हा पहिला रियाज असतो, मी ऐकत खूप गेलो. चांगले रसिक घडायचे असेल तर आपल्याला वाढायला लागेल. माझी ओळख ही वन लायनर आहे. गाणे कितीही तल्लीन होऊन ऐकत असलो तरी गाणे हे माझे सर्वस्व नाही. मी एक्सप्रेशनिस्ट आहे. संगीत ही सामाजिक घटना आहे. ती शुन्यातून निर्माण होत नाही. गाणो ही ऐकण्याबरोबर बघण्याची देखील गोष्ट आहे. हे भारतीयांना न पटण्यासारखे नाही. आपण गाणे हे पाहिलेले देखील असते. दृश्य कला आणि श्रवण कला या भगिनी आहेत. संगीत हे दृश्यकलेला आव्हान देणारे असते. इनडिपेण्डंट म्युझिकची जगभर लाट आहे. हे म्युझीक मराठीत आणावे. आपल्या मराठी संगीतात होणा-या चांगल्या गोष्टी या परभाषिकांर्पयत पोहोचाव्या. संगीत रसिक म्हणून आपल्या सांगितीक कक्षा विस्ताराव्या लागतील. अभिरुचितला फरक आपण जाणून घेतला पाहिजे. ज्यांना पाश्चात्य संगीत हे कर्णकटू वाटत असेल त्यांनी कंट्री संगीतापासून सुरूवात करावी. तुम्ही गायक असा किंवा नसा गात मात्र जा असा सल्ला त्यांनी दिला.