शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

अभिनय कट्ट्यासारखा एखादा कट्टा पुण्यात असता तर तो नियमांतच गेला असता - सुबोध भावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2018 13:17 IST

रविवारी सकाळी ९ वाजल्यापासून ४०० व्या अभिनय कट्ट्याचा सोहळा सुरू आहे. त्यात सुबोध भावे यांनी देखील उपस्थिती लावली.

ठळक मुद्दे एखादा कट्टा पुण्यात असता तर तो नियमांतच गेला असता - सुबोध भावेसुबोध भावे यांची मुलाखत घेतली किरण नाकती यांनी भावे यांच्या हस्ते उद्योजक कट्टा व फॅमिली कट्ट्याच्या पोस्टरचे अनावरण

ठाणे: अभिनय कट्ट्यासारखा एखादा कट्टा दुर्दैवाने पुण्यात नाही, असा कट्टा असता तर तो नियमांतच गेला असता अशी विनोदी टिपणी करत अभिनेते सुबोध भावे यांनी पुणेकरांचे कर्तुत्व मोठे आहे अशा शब्दांत कौतुकही केले.      रविवारी सकाळी ४०० व्या अभिनय कट्ट्यावर अभिनेते सुबोध भावे यांची मुलाखत कट्ट्याचे संचालक, दिग्दर्शक किरण नाकती यांनी घेतली. नाकती यांनी त्यांच्या चित्रपचटातील प्रवासाविषयी अनेक प्रश्न विचारुन त्यांना बोलते केले. रंगमंचावर काम करण्याबरोबर पडद्यामागे काम करण्याची जबाबदारीही तितकी जास्त असते. कोणत्याही कलाकाराचा प्रवास हा संपूर्ण होत नसतो. कलाकाराचे जीवन हे शाळेतल्या पाटीसारखे असावे. त्या पाटीला पुन्हा एकदा नव्याने कोरता आले पाहिजे. मी सुबोध भावे म्हणून एक सामान्य माणूस आहे, परंतू त्या त्या भूमिकांनी मला असामान्य बनविले हे जोपर्यंत मी माझ्यात भिनवत नाही तोपर्यंत मी नव्याने भूमिका करीत नाही. कोणत्याही महापुरुषांच्या भूमिका साकारताना त्यांच्या कामाचा, व्यक्तीरेखांचा आदर केला पाहिजे. कलेप्रती कलाकारांची वृत्ती समर्पणाची असावी, आपण जेव्हा कलेशी प्रामाणिक राहतो तेव्हा ती कला आपल्याला कधी अंतर देत नाही. लोक सोडून जातात पण कला कधी सोडून जात नाही. भावे यांच्या हस्ते उद्योजक कट्टा व फॅमिली कट्ट्याच्या पोस्टरचे अनावरण करण्यात आले. सुरूवातीला अभिनय कट्टा संचलित दिव्यांग कला केंद्राच्या विद्यार्थ्यांनी ‘नाकावरच्या रागाला औषध काय’ यावर नृत्य सादर करुन सुबोध भावे यांचे मन जिंकले. त्यानंतर कट्ट्याच्या कलाकारांनी सुबोध भावे यांच्या बालगंधर्वपासून डॉ. काशिनाथ घाणेकरपर्यंतच्या सर्व व्यक्तिरेखा साकारत त्यांचा चित्रपटातील प्रवास उलगडला. नाकती यांच्या हस्ते सुबोध भावे यांना अभिनय कट्टा गौरव पुरस्कार २०१८ हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

टॅग्स :thaneठाणेSubodh Bhaveसुबोध भावे Mumbaiमुंबई