शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
4
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
5
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
6
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
7
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
8
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
9
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
10
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
11
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
12
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
13
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
14
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
15
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
16
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
17
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
18
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
19
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
20
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
Daily Top 2Weekly Top 5

दुसऱ्या डोसला उशीर झाला, तरी घाबरू नका

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2021 23:37 IST

लसीचा पहिला डोस देतो प्रतिकारक्षमता : दुसऱ्या डोसकरिता होत आहे अनेकांची घालमेल

अजित मांडके

ठाणे : मागील काही दिवसांपासून कोरोना लसींचा तुटवडा जाणवू लागल्यामुळे दुसरा डोस घेण्यासाठी नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. ज्येष्ठ नागरिकांचे हाल होताना दिसत आहेत. ठरावीक कालावधीत दुसरा डोस घ्यावा, असे आरोग्य यंत्रणेकडून सांगण्यात येत असले तरी दुसरा डोस घेण्यास उशीर झाला तरी काळजी करण्याचे कारण नाही, लस आपल्या शरीरात काम करीत असते. त्यामुळे घाबरून न जाता उशिरा झाला तरी काळजी करण्याचे कारण नसल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले.

ठाण्यासह जिल्ह्यात ठिकठिकाणी लसींचा तुटवडा निर्माण झाला आहे. सुरुवातीला हेल्थ वर्कर, त्यानंतर फ्रन्टलाइन वर्कर, ६० वर्षावरील ज्येष्ठ नागरिक, ४५ वर्षांपुढील नागरिक आणि आता १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण सुरू झाले आहे. परंतु लसींचा तुटवडा असल्याने लसीकरणाची मोहीम जिल्ह्याच्या ठिकाणी कोलमडून पडली आहे. कुठे कोविशिल्डचा साठा अपुरा पडत आहे, तर कुठे कोव्हॅक्सिनचा साठा उपलब्ध नसल्याचे चित्र आहे. काही ठिकाणी दुसरा डोस दिला जात असून, काही ठिकाणी केवळ १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांनाच पहिला डोस दिला जात आहे.

परंतु दुसरा डोस मिळविण्यासाठी नागरिक पहाटे ५ वाजेपासून रांगा लावत आहेत. दिवसाला अनेक केंद्रांवर कुठे ५०, तर कुठे ८० जणांनाच टोकन दिले जात आहे. त्यामुळे उर्वरिताना घरी जावे लागत आहे. काहींनी मार्च महिन्यात पहिला डोस घेतला. त्यानंतर चार ते सहा आठवड्यात दुसरा डोस घ्यावा, असे आरोग्य यंत्रणेने सांगितले होते. परंतु जवळ जवळ दोन महिने उलटून गेले तरी लस उपलब्ध होत नसल्याने नागरिक निराश झाले आहेत.त्यातच आता १८ ते ४४ वयोगटासाठी लसीकरण सुरू झाल्याने दुसरा डोस घेणाऱ्यांचे आणखी हाल झाले आहेत. काहींनी कोव्हॅक्सिनचा पहिला डोस घेतला असल्याने केवळ लसींचा साठा उपलब्ध नसल्याने त्यांना दुसरा डोस घेता आलेला नाही. दुसरा डोस वेळेत घेतला नाही तर कोरोना होण्याची भीती त्यांच्या मनात घर करू लागली आहे. परंतु घाबरण्याचे काही कारण नसल्याचे आरोग्य यंत्रणेने स्पष्ट केले आहे. दुसरा डोस घेण्यात काही दिवस मागे पुढे झाले तरी त्यामुळे घाबरण्याचे कारण नसल्याचे आरोग्य यंत्रणेने स्पष्ट केले.

पहिला डोस घेतल्यानंतर यापूर्वी २८ दिवस थांबावे लागत होते. परंतु आता शासनाने गाइडलाइन्स बदलल्या असून, त्यानुसार पहिला डोस घेतल्यानंतर किमान चार ते सहा आठवडे थांबून दुसरा डोस घेता येऊ शकतो. त्यामुळे किमान सहा आठवडे दुसरा डोस घेण्यासाठी थांबावे असे सांगण्यात आले आहे.

कोव्हॅक्सिनचा पहिला डोस घेतल्यानंतर २८ दिवस थांबावे लागते, तर कोविशिल्डचा पहिला डोस घेतल्यानंतर ४५ दिवस थांबावे लागते. परंतु यातही कुठे मागे पुढे झाले तरी घाबरण्याचे कारण नाही, कारण ही लस शरीरात आपल्या परीने काम करीत असते, लसीचा दुसरा डोस घेतल्यानंतर प्रतिकारक्षमतेत वाढ होते. परंतु उशीर झाल्यास नागरिकांनी घाबरून जाऊ नये.    - कैलाश पवार, जिल्हा शल्य चिकित्सक, ठाणे

टॅग्स :thaneठाणेCorona vaccineकोरोनाची लस