शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

... तर दिवाळीतील लाडू होणार कडू , ७ वर्षांपासूनच्या मागण्या प्रलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2017 01:33 IST

जिल्हा व तालुका पुरवठा कर्मचा-यांच्या सुमारे २०१० पासून आश्वासन दिलेल्या मागण्या अद्याप ही मंजूर झालेल्या नाहीत.

ठाणे : जिल्हा व तालुका पुरवठा कर्मचा-यांच्या सुमारे २०१० पासून आश्वासन दिलेल्या मागण्या अद्याप ही मंजूर झालेल्या नाहीत. यामुळे संतापलेल्या या कर्मचा-यांनी अखेर मंगळवारी सकाळपासून राज्यस्तरीय बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले. ऐन दिवाळीत सुरू झालेल्या या आंदोलनाची वेळीच दखल न घेतल्यास जिल्ह्यातील शिधावाटप दुकानांवर सणासुदीच्या अन्नधान्यांसह साखर, तेल आदी जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा होणार नाही. यामुळे दिवाळीचा लाडू मात्र कडू होण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे.या आंदोलनात ठाणे जिल्ह्यातील सुमारे २०० कर्मचाºयांचा समावेश असल्याचे राज्य महसूल कर्मचारी संघटनेच्या ठाणे जिल्हा शाखेचे सरचिटणीस कापडे यांनी लोकमतला सांगितले. या कामबंद आंदोलनाची वेळीच दखल न घेतल्यास दिवाळी सणानिमित्त जिल्ह्याच्या ग्रामीण, दुर्गम, आदिवासी भागातील सुमारे ५९३ शिधावाटप दुकानांवर सणासुदीचे अन्नधान्य, गोडे तेल, साखर, डाळी आदींचा पुरवठा अजिबात होणार नाही. परिणामी सुमारे लाखो ग्रामस्थ, आदिवासी कुटुंबिय दिवाळीत लाडू सारख्या गोडधड पदार्थापासून वंचित राहण्याची शक्यता आहे.जिल्हास्तरीय पुरवठा विभागाचे वर्ग तीन व वर्ग चार श्रेणीच्या कर्मचाºयांनी या आंदोलनात सहभाग घेतला आहे. बेमुदत कामबंद आंदोलना दरम्यान कर्मचारी कार्यालयात उपस्थित राहणार आहेत. मात्र, ते कोणत्याही प्रकारचे काम करणार नाहीत. त्यांच्या या असहकारमुळे ग्रामीण कुटुंबियाना जीवनावश्यक वस्तुंचा तुटवडा जाणवणार आहे. राज्य महसूल कर्मचारी संघटनेच्या नेतृत्त्वाखाली जिल्ह्यातील २०० पेक्षा अधिक कर्मचाºयांनी या आंदोलनात सहभाग घेतला आहे. तहसीलदारांच्या नियंत्रणातील पुरवठा कर्मचारी देखील या आंदोलनात आहेत.या आंदोलनापाठोपाठ १० आॅक्टोबरपासून महसूल कर्मचारी देखीलबेमुदत आंदोलन छेडणार आहेत. ऐन दिवाळीत राज्यभर होणाºया या आंदोलनादरम्यान अन्नधान्याच्या पुरवठा व शासकीय कामांना खीळ बसणार आहे.

टॅग्स :thaneठाणे