शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
2
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
3
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
4
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
5
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
6
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
7
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
8
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
9
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
10
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
11
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
12
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
13
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
14
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
15
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
16
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
17
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
18
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
19
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
20
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय

मानसिक आरोग्याबाबत जबाबदारी ओळखा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2021 00:26 IST

डॉ. शिल्पा आडारकर

ठाणे : मानसिक आरोग्याचा पाया जितका बळकट तेवढा विषाणूचा, ताणतणावाचा जोर कमी होतो. या वर्षी मानसिक आरोग्य जपण्याचा संकल्प करू या. माझे कुटुंब, माझी जबाबदारीप्रमाणे माझे मानसिक आरोग्य, माझी जबाबदारी ओळखू या असा मोलाचा सल्ला केईएम रुग्णालयातील अधिव्याख्यात्या डाॅ. शिल्पा आडारकर यांनी दिला, तसेच २०२०ला नावे ठेवून चालणार नाही. २०२०ने दिलेली शिकवण विसरता कामा नये. २०२० ला गुरुस्थानी मानले पाहिजे, असेही त्या म्हणाल्या.

सरस्वती सेकंडरी स्कूलच्या सभागृहात रामभाऊ म्हाळगी व्याख्यानमालेतील दुसरे पुष्प गुंफताना ‘कोरोनानंतरची सद्य:स्थिती व मानसिक आरोग्य’ या विषयावर डॉ.आडारकर बोलत होत्या. त्यांनी २०२० या वर्षातील कोविड काळातील लॉकडाऊन ते अनलॉकपर्यंतच्या जनजीवनातील बऱ्या-वाईट बाबींचा ऊहापोह केला. कोरोनामुळे वर्क फ्रॉम होम, लॉकडाऊनसारखे नवीन शब्द निर्माण झाले असे असले, तरी यामुळे सोशल मीडियासोबतच व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटी फोफावल्याने अनेकांना स्वावलंबनाचे धडे, एकत्र कुटुंब पद्धती, पाक कौशल्याची अनुभूती घेता आली. या काळात एकमेकांना मदत करण्याच्या भावनेने अनेक दाते निर्माण झाले. जगण्यासाठी कमीतकमी गोष्टींची गरज भासते, हे या काळाने शिकविले. मात्र, त्याचबराेबरीने अत्याचार, बाललैंगिक छळ, घटस्फोटाची प्रकरणे वाढली, सोशल डिस्टन्सिंग पाळण्यामुळे एकटेपणाची भावना वाढून ज्येष्ठांत नैराश्याची भावना, मुलांत आक्रमकता, तर तरुणाईत उदासीनता पसरल्याचे त्या म्हणाल्या.

‘प्रत्येकाने दीर्घ श्वसनाची सवय लावा’लॉकडाऊनमध्ये घरूनच काम केल्याने सतत स्क्रिनसमोर राहिल्याने स्थूलता वाढण्याबरोबरच झोपेच्या, डोळ्यांच्या आणि इतर शारीरिक व्याधींच्या तक्रारी वाढल्या. असे असले, तरी २०२० या वर्षात वेळेचे नियोजन, स्वच्छता, मास्कचा नियमित वापर आणि संतुलित आहाराची सवय लागल्याने आरोग्यावर सकारात्मक परिणाम झाला. अनलॉकनंतर काहींच्या बेजबाबदारपणामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने आरोग्य व्यवस्थेवर ताण आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. प्रत्येकाने दीर्घ श्वसनाची सवय लावून घेणे आरोग्यदायी ठरेल, असा कानमंत्रही त्यांनी दिला.

टॅग्स :thaneठाणे