शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

आदर्श शिक्षक केवळ कागदावर नसावा तो विद्यार्थ्यांच्या काळजावर असावा : प्रा. प्रविण दवणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2019 16:45 IST

प्रा. प्रविण दवणे यांनी आपल्या मार्गदर्शनपर वक्तव्यातून आजच्या शिक्षकांना कानमंत्र आणि सल्ला दिला. तसेच, नव्या पिढीचे त्यांनी कौतुक केले.

ठळक मुद्दे आदर्श शिक्षक विद्यार्थ्यांच्या काळजावर असावा : प्रा. प्रविण दवणेकोचिंग क्लासेस संचालक संघटनेच्यावतीने आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळाप्रकाश पाटील यांना ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानीत

ठाणे : आदर्श शिक्षक हा केवळ कागदावर नसावा तर तो विद्यार्थ्यांच्या काळजावर असावा. आदर्शपण हे रियाजामुळे मिळत असते. परंतू हल्ली तो रियाजच हरवत चालला आहे अशी खंत ज्येष्ठ कवी प्रा. प्रविण दवणे यांनी व्यक्त केली. भारत वाचणार असेल तर तो पालक आणि तळमळीने शिकवणाऱ्या शिक्षकांमुळेच. आजची पिढी उत्तम आहे परंतू ज्यांच्या हातात ती पिढी आहे ते पालक आणि शिक्षक किती संवेदनशील आहेत असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.          कोचिंग क्लासेस संचालक संघटनेच्यावतीने बुधवारी शिक्षक दिनाच्यानिमित्ताने ठाणे जिल्ह्यातील सर्व खासगी कोचिंग संचालकांसाठी आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळा शहनाई हॉल येथे संपन्न झाला. यावेळी विद्याश्री क्लासेसचे प्रकाश पाटील यांना ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. तसेच, शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार, सभासद सन्मान पुरस्कार, उत्कृष्ट सभासद पुरस्कार, पुरग्रस्तांना निधी देणाºया शिक्षकांना पुरग्रस्त मदतनिधी प्रशस्तीपत्रक आणि नविन सभासदांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. विद्यार्थी घडविण्यासाठी शिक्षकांचे व्यक्तिमत्त्वही महत्त्वाचे अशते असा कानमंत्र देत प्रा. दवणे म्हणाले, आजची पिढी ही शिक्षकांना तपासून घेत असते. पहिल्या तीन चार ओळींतच विद्यार्थ्याला कळते की त्या शिक्षकाचा किती सखोल अभ्यास आहे. आता नव्या पिढीला चकवणे हे अशक्य आहे कारण आताची पिढई तरबेज आहे. मी माझ्या अध्यापनाच्या ३५ वर्षांत कधीही विद्यार्थ्याला गेट आऊट म्हणालो नाही कारण विद्यार्थी वर्गाबाहेर हकलला की विद्यार्थी बाहेर जातो आणि समस्या आत येते. खरा शिक्षक हा मस्टरवर नाही तर नव्या पिढीच्या डोळ््यावर सही करतो. माझ्या नावावर सव्वाशे पुस्तके आहे त्याचे मुळ मी शिक्षक आहे यात आहे. मी आॅफ तास हा कधीही आॅफ ठेवला नाही तर आॅफ तास मी आॅन ठेवला. मी केवळ शाळेत, ग्रंथालयात शिकलो नाही तर शिक्षण जगवणाºया गुरुवर्यांकडे पाहूनही शिकलो. शैक्षणिक संघटना परिपक्व झाल्या तर समाज पुढे जाईल असा सल्लाही दवणे यांनी दिला. यावेळई वरिष्ठ पोलीस निरीक्षक ए. एस. पठाण उपस्थित होते. ते म्हणाले, जगात आई वडिल आणि शिक्षक हे तीन शब्द आदर्श आहे. शिक्षक हा समाज घडवित असतो. यावेळी पठाण यांनी सर उठाओ तो कोई बात बने हे गाणे सादर केले. सोहळ््या प्रसंगी संघटनेचे सतीश देशमुख, सचिव सचिन सरोदे, खजिनदार सुनिल सोनार व इतर उपस्थित होते.

टॅग्स :thaneठाणेMumbaiमुंबईcultureसांस्कृतिक