शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

‘थर्ड’च्या कल्पनेने धाबे दणाणले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2018 03:39 IST

या कामांचा दर्जा बांधकाम मानकानुसार आहे किंवा नाही. त्यात वापरलेले सिमेंट, खडी, स्टील यांचा दर्जा आयएस कोडनुसार आहे किंवा नाही, यासह इतर बाबींची तांत्रिक तपासणी करून त्याचा अहवाल शासनास देण्याचे बंधन घातले आहे.

ठाणे : केंद्र व राज्य सरकारच्या नगरविकास विभागाकडून मिळणाऱ्या अनुदानातून राज्यातील वेगवेगळ््या महापालिका हद्दीत करण्यात येणाºया विकासकामांचा दर्जा राखला जात नसून त्यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याच्या तक्रारी वाढल्याने या विकासकामांचे नगरपालिका संचालनालयासह विविध नामांकित संस्थांकडून कठोर थर्ड पार्टी आॅडिट (तांत्रिक तपासणी) करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे ठाणे जिल्ह्यातील ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी, मीरा-भार्इंदरसह पालघरच्या वसई-विरार आणि रायगडमधील पनवेल महापालिकेसह मुंबई महापालिकेतील अधिकारी आणि ठेकेदारांचे धाबे दणाणले आहेत. यातील ज्या महापालिकांत शिवसेना सत्तेवर आहे तेथील कामांमध्ये त्रुटी व भ्रष्टाचार आढळल्यास येत्या निवडणुकीत सेनेला घेरण्याची संधी भाजपाला मिळणार आहे.दोन टप्प्यात होणार तांत्रिक तपासणीमुंबईतील रस्त्यांच्या कामांचा विषय चव्हाट्यावर आला व अनेक अधिकारी आणि ठेकेदारांवर गुन्हे दाखल झाले. शासनाने नगरविकास विभागाकडून करण्यात येणाºया विविध विकासकामांची कठोर तांत्रिक तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या जिल्ह्यातील महापालिकांना केंद्र सरकारकडून जेएनएनयूआरएम, स्मार्ट सिटी, अमृत योजना, सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियानांतर्गत दरवर्षी मिळणाºया कोट्यवधींच्या अनुदानातून अनेक विकासकामे सुरू आहेत. काही पूर्ण झाली असून काही प्रगतीपथावर आहेत. या सर्व कामांची आता दोन टप्प्यांत तांत्रिक तपासणी सक्तीची केली आहे. यातील पहिल्या टप्प्यातील तांत्रिक लेखापरीक्षण नगरविकास विभागाकडून मिळणाºया अनुदानातून करण्यात येणाºया सर्वच कामांसाठी असून त्यासाठी राज्यातील नऊ नामवंत संस्थांची निवड केली आहे. या संस्थांकडून ते करावयाचे आहे. यासाठी त्यांना किती शुल्क द्यायचे, हेही शासनाने निश्चित केले आहे. दुसºया टप्प्यात राज्यस्तरीय तांत्रिक लेखापरीक्षण करावयाचे असून आयुक्त / संचालक नगररचना यांच्या स्तरावर ते करायचे आहे. पहिल्या टप्प्यातील लेखापरीक्षणानंतरही आलेल्या तक्रारींपैकी १० टक्के तक्रारींमध्ये दुसºया टप्पातील लेखापरीक्षण करावयाचे आहे.या विकासकामांमध्ये रस्ते, उड्डाणपूल, भुयारी मार्ग, मलनि:सारण वाहिन्या, एसटीपी, पाणीपुरवठा करणाºया वाहिन्या, जलकुंभ, जलशुद्धीकरण प्रकल्प, गटारे, दिवाबत्ती, उद्याने,स्टेडियम, वैशिष्ट्यपूर्ण योजना व इतर कामांचा समावेश आहे. याकामांचा दर्जा बांधकाम मानकानुसार आहे किंवा नाही. त्यात वापरलेले सिमेंट, खडी, स्टील यांचा दर्जा आयएस कोडनुसार आहे किंवा नाही, यासह इतर बाबींची तांत्रिक तपासणी करून त्याचा अहवाल शासनास देण्याचे बंधन घातले आहे. 

टॅग्स :road transportरस्ते वाहतूक