शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

मी कोणतीही पगडी घालणार नाही- प्रेमानंद गज्वी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2019 00:54 IST

ठाण्यात रंगला नाट्यसंमेलनाध्यक्षांचा सत्कार सोहळा

ठाणे : नाट्य किंवा साहित्य संमेलनात पेशवाई पगडी घातली जाते; मात्र मी कोणतीही पगडी घालणार नाही. माझी पगडी ही माझी असेल, ती ज्ञानाची असेल. विचारांची पगडीच मी संमेलनात घालणार आहे. जे कोणी पगडी घालू इच्छितात त्यांच्यामागे त्यांची तत्त्वप्रणाली असते. प्रत्येक तत्त्वप्रणाली ही परिपूर्ण नसते, म्हणून मला कोणाचीही पगडी नको, असे स्पष्ट मत प्रसिद्ध नाटककार आणि ९९ व्या मराठी नाट्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष प्रेमानंद गज्वी यांनी रविवारी ठाण्यात व्यक्त केले.महाराष्ट्र साहित्य परिषद ठाणे शाखा यांच्यावतीने गज्वी यांच्या सत्काराचा कार्यक्रम मराठी ग्रंथ संग्रहालयात आयोजिला होता. प्रसिद्ध समीक्षक डॉ.अनंत देशमुख यांच्या हस्ते गज्वी यांचा सत्कार करण्यात आला. या सत्कारानंतर झालेल्या मुलाखतीदरम्यान ते बोलत होते. साहित्य आणि नाटक हे दोन्ही वेगवेगळे आहेत, असे मला वाटत नाही. नाटक वाङ्मयचाच भाग आहे. नाटक लिहून दिग्दर्शकाकडे जाते, मग नाटकाचे रूपांतर संहितेत होते. नाटकाला साहित्याचा दर्जा मिळालाच पाहिजे. खरं तर आपल्याकडे होणारी वेगवेगळी नाट्य आणि साहित्य ही संमेलने एकाचवेळी घ्यायला हरकत नाही, असे गज्वी म्हणाले. तर वर्षभर मी उपक्रम राबवावे म्हणून माझी निवड केलेली नाही. संमेलनाध्यक्ष नाही तर उपक्रम राबविण्यासाठी साहित्य महामंडळ आणि नाट्य परिषद असून परिषदेने विविध उपक्रमाांसाठी आर्थिक तरतूद करावी, असे मत व्यक्त केले. मकरंद जोशी यांनी त्यांची मुलाखत घेतली.‘मातोश्री’चे आज चित्र बदललेत्याकाळी आम्ही मित्रांनी केलेल्या हुंडाविरोधी चळवळीच्या बातम्या वाचून बाळासाहेब ठाकरेंनी आम्हाला मातोश्रीवर बोलावून एकत्र काम करण्याचे सुचविले होते. कालांतराने शिवसेनेने हिंदुत्वावर जास्त जोर दिला आणि मग सत्तेसाठी भांडणे सुरू झाली. मी तिथे गेलो असतो तर मला हे सगळे लिहिता आले नसते. परंतु माझे तिथे न गेल्याने काही बिघडलेले नाही आणि आज मातोश्रीचे चित्र बदलले आहे अशी खंत गज्वी यांनी यावेळी बालून दाखवली.