ठाणे: ‘मैं भी चौकीदार’ या कार्यक्रमांतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील भाजप कार्यकर्त्यांशी व्हीडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. देशभरातील ५०० ठिकाणांपैकी मुंबईसह मोजक्याच ठिकाणच्या कार्यकर्त्यांना मोदी यांच्याशी दुहेरी संवाद साधण्याची संधी रविवारी मिळाली. कार्यकर्त्यांनी विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी मोकळेपणाने उत्तरे दिली.ठाणे महापालिका भवनाजवळील ज्ञानराज सभागृहात ३१ मार्च रोजी सायंकाळी ५ ते ६.३० वा. च्या दरम्यान हा कार्यक्रम पार पडला. पंतप्रधानांनी थेट दिल्ली येथून हा संवाद साधला. महाराष्टÑातील मुंबई, ओरिसा, बिहार, उत्तरप्रदेश, अरुणाचल प्रदेश आणि राजस्थान अशा मोजक्याच राज्यातील सात ते आठ कार्यकर्ते आणि नागरिकांना मोदी यांच्याशी संवाद साधला. आपली शक्ती तपासण्यासाठी अंतरिक्ष यानाचीही चाचणी घेण्यात आली, यात गैर काहीच नाही. बडया भ्रष्टाचाऱ्यांना तुरुंगाच्या दारापर्यंत आणले आहे. यापुढे त्यांना तुरुंगात घातले जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.दिड तास रंगलेल्या या संवादाच्या कार्यक्रमात आपण कसा विकास केला यावरच त्यांनी भर दिला. यावेळी भाजपचे ठाण्याचे आमदार संजय केळकर, शहर अध्यक्ष संदीप लेले, शिवसेना खासदार राजन विचारे, शिवसेना जिल्हा प्रमुख (ठाणे लोकसभा) नरेश म्हस्के आदी उपस्थित होते...................................भाजपच्या अनेक नगरसेवकांची दांडीया कार्यक्रमाला भाजपच्या २३ पैकी गटनेते अशोक राऊळ, नारायण पवार, संजय वाघुले, सुनेश जोशी, माजी उपमहापौर मुकेश मोकाशी, प्रतिभा मढवी, नंदा पाटील, दीपा गावंड, स्रेहा आंब्रे, नम्रता कोळी अशा मोजक्याच नगरसेवकांनी हजेरी लावली. इतरांनी दांडी माारल्याने अनेक तर्क वितर्क केले जात होते.अर्थात, नारायण पवार आणि अशोक राऊळ यांच्या संदर्भात त्यांना त्रास होणार नाही, याची काळजी घेतली जाईल, असे वरिष्ठ पातळीवर ठरल्याने ठाण्याच्या स्थानिक पातळीवरील सेना भाजपमधील नाराजीचे मळभ आता दूर झाल्याचा दावा भाजपच्या एका वरिष्ठ पदाधिका-याने केला. युती झालेली असल्याने आता हे किरकोळ विषय मागे ठरल्याचा दावाही करण्यात आला. पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्यमंत्री रविंद्र चव्हाण या वरिष्ठ पातळीवरच नगरसेवकांच्या नाराजीचा विषय मिटला असल्याचा दावाही ठाणे शहर अध्यक्ष अॅड. संदीप लेले यांनी केला. कार्यक्रमानंतर अशोक राऊळ आणि नारायण पवार यांच्याशी संवाद साधत भाजपमधील नाराजी दूर करण्याचा खासदार विचारे यांनीही पुनश्च प्रयत्न केला.
मैं भी चौकीदार: पंतप्रधानाच्या कार्यक्रमाला ठाण्यात भाजपच्या अनेक नगरसेवकांची दांडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2019 23:07 IST
ठाण्यात भाजपने आयोजित केलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मै भी चौकीदार हू’ या संवादाच्या कार्यक्रमाला भाजपच्याच अनेक नगरसेवकांची अनुपस्थिती चर्चेचा विषय ठरली. शिवसेना खासदार राजन विचारे यांनीही कार्यक्रमानंतर भाजपच्या नगरसेवकांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला.
मैं भी चौकीदार: पंतप्रधानाच्या कार्यक्रमाला ठाण्यात भाजपच्या अनेक नगरसेवकांची दांडी
ठळक मुद्देनाराजीचे मळभ दूर करण्यासाठी राजन विचारेंचे प्रयत्नज्ञानराज सभागृहात झाला कार्यक्रमयुतीच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती