शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: ठाकरे बंधूंचा 'विजयी मेळावा'! तुफान गर्दी, प्रचंड उत्साह, वरळी डोममध्ये काय घडतंय?
2
मराठीचा विजयी मेळावा, ठाकरे बंधू येणार एकत्र, ऐतिहासिक सभेला सुप्रिया सुळेसुद्धा राहणार उपस्थित
3
Zerodha च्या संस्थापकांचा मोठा इशारा, एक्सचेज आणि ब्रोकर्ससाठी वाईट ठरू शकतं हे वृत्त; का म्हणाले नितीन कामथ असं?
4
"…हे तर पुतना मावशीचे प्रेम!’’ भाजपाचा उद्धव ठाकरेंना टोला, ती उदाहरणं देत साधला निशाणा
5
ठाकरे बंधूंचा आज 'विजयी मेळावा'; उद्धव अन् राज २० वर्षांनंतर एकत्र दिसणार! किती वाजता सुरू होणार मेळावा?
6
"मराठी भाषेचा विजय झालाय!"; ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात सिद्धार्थ-भरत जाधव, तेजस्विनी पंडित दाखल, व्यक्त केला आनंद
7
आषाढीला करा उपासाची थंडगार रसमलाई; घरचे खुश होतील, पुन्हा पुन्हा मागून खातील!
8
'एअर इंडिया'च्या अडचणी संपेनात! ऐन उड्डाणाच्या वेळीच पायलटला चक्कर आली अन्...; कुठे घडला 'हा' प्रसंग?
9
Ashadhi Ekadashi 2025: आषाढीला भक्तिरंगात न्हाऊन निघा; प्रियजनांना पाठवा 'हे' शुभेच्छा संदेश!
10
Uttar Pradesh: चालकाचे नियंत्रण सुटलं अन् कार उलटून थेट भिंतीवर आदळली, आठ जण ठार!
11
बायकोचं सुरू होतं अफेअर; नवऱ्यासह २ मुलांना दिलं विष, वाचल्यानंतर केला चाकूने हल्ला
12
अदानी बदलणार का ₹३ च्या शेअरच्या कंपनीचं नशीब? खरेदी करण्याच्या रेसमध्ये सर्वात पुढे
13
नवऱ्याने भरपूर त्रास दिला, पण बॉयफ्रेंड त्यापेक्षा भयंकर निघाला! ४ वर्षांच्या मुलानं सांगितलं आईसोबत काय घडलं...
14
ट्रेनमध्ये ८० रुपये आणि स्टेशनवर ७० रुपयांत मिळणार व्हेज जेवण; रेल्वे मंत्रालयानं शेअर केला संपूर्ण मेन्यू
15
भूखंड घोटाळा : एक अधिकारी निलंबित, ८ जणांची चौकशी; मालेगाव येथील प्रकार; दोघा स्टॅम्प व्हेंडरवरही फौजदारी कारवाई
16
Gold Price Today : आनंदाची बातमी! ...तर सोन्याच्या किंमती कमी होणार?, अर्थतज्ज्ञांनी कारण सांगितलं
17
"त्याच्यासोबतचं माझं नातं…’’,अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत संबंध ठेवणाऱ्या शिक्षिकेचा धक्कादायक दावा
18
Maharashtra Weather: मुंबई, ठाण्यात मुसळधार पाऊस कोसळणार; रत्नागिरी, रायगडसह 'या' जिल्ह्यांना आज ऑरेंज अलर्ट
19
SIP: केवळ २.४० लाखांची गुंतवणूक आणि ₹४६.५६ लाखांचं व्याज; ही आहे कम्पाऊंडिंगची ताकद, कशी होईल ही कमाल?
20
Sena-MNS Rally: ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यापूर्वी संदीप देशपांडेंनी घातलेल्या टी-शर्टनं वेधलं लक्ष!

हायड्रोलिक मशीन कोसळल्याने मजूर ठार, एक गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2019 01:22 IST

गोदामाच्या दुसऱ्या माळ्यावरून हायड्रोलिक प्रेस मशीन कोसळल्याने एक मजूर जागीच ठार, तर दुसरा गंभीर जखमी झाल्याची घटना पिंपळास येथील औद्योगिक वसाहतीत बुधवारी रात्री घडली.

भिवंडी : विविध साहित्याच्या पॅकिंगसाठी नव्याने उभारण्यात आलेल्या गोदामाच्या दुसऱ्या माळ्यावरून हायड्रोलिक प्रेस मशीन कोसळल्याने एक मजूर जागीच ठार, तर दुसरा गंभीर जखमी झाल्याची घटना पिंपळास येथील औद्योगिक वसाहतीत बुधवारी रात्री घडली. विपिन पासवान (३०) हे ठार झालेल्या मजुराचे, तर जमील अली हुसेन अन्सारी (३२, रा. पिराणीपाडा) हे जखमी मजुराचे नाव आहे. हे दोन्ही मजूर मौजे पिंपळास येथील औद्योगिक वसाहतीमधील एफ-४, बिल्डिंग नं. १०१ येथे नव्याने बांधण्यात आलेल्या गोदामात विविध साहित्याच्या पॅकिंगसाठी वापरण्यात येणारी हायड्रोलिक प्रेस मशीन बुुधवारी रात्री दुसºया माळ्यावर चढवत होते.ही अवजड मशीन चढवण्याचे काम सुरू असताना अचानकपणे मशीनसह दोन्ही मजूर ३० फूट उंचावरून कोसळले. त्यावेळी हायड्रोलिक मशीन या दोघा मजुरांच्या अंगावर कोसळल्याने विपिन पासवान हा जागीच ठार झाला, तर जमील अली हा गंभीर जखमी झाला. तो बेशुद्ध असून, माणकोली येथील हॉस्पिटलमध्ये त्याच्यावर उपचार सुरू आहेत. त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.या दुर्घटनेप्रकरणी पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासामध्ये मजूर ठेकेदाराचा दोष असल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार कोनगाव पोलीस ठाण्यात मजूर ठेकेदार मयूर दशरथ पाटील (३०, रा. पिंपळास) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक नरेंद्र पवार करीत आहेत.