शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडीत चारित्र्याच्या संशयावरून पतीने केली पत्नीची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2020 16:47 IST

लक्ष्मी रामरतन भारती (३५) असे  निर्घृण हत्या झालेल्या पत्नीचे नाव आहे.

भिवंडी: महिलांवरील अन्याय अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढत असतांनाच चारित्र्याच्या संशयावर पतीने पत्नीची हत्या केल्याची खळबळजनक घटना सोमवारी शहरातील गायत्रीनगर येथे घडली आहे. या हत्येप्रकरणी शांतीनगर पोलिसांनी पती विरोधात गुन्हा दाखल करून त्यास अटक केली आहे. 

लक्ष्मी रामरतन भारती (३५) असे  निर्घृण हत्या झालेल्या पत्नीचे नाव आहे. तर रामरतन सुखलाल भारती (४०) असे हत्येप्रकरणी अटक केलेल्या पतीचे नाव आहे. शहरातील गायत्रीनगर परिसरातील एका चाळीत आरोपी रामरतन हा मृतक पत्नी लक्ष्मी हिच्या सोबत राहत होता. आरोपी पती रामरतन हा लॉकडाऊनच्या काळात बेरोजगार झाला होता. त्यामुळे आर्थिक अडचणीतून जात असताना तो पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत होता. त्यातूनच या पती - पत्नीमध्ये रोज भांडण होत होते. सोमवारी दोघा पती पत्नी मध्ये कडाक्याचे भांडण झाले होते. यावेळी रामरतन याने पत्नीच्या डोक्यात , चेहऱ्यावर व हातावर लोखंडी अँगलने जोरात मारहाण केली होती. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या पत्नीला इंदिरा गांधी उप जिल्हा रुग्णालयात 

उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र तिची प्रकृती अधिकच खलावल्याने तिला पुढील उपचारासाठी ठाण्यातील कळवा येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र तिच्यावर उपचार सुरु असताना तिचा मृत्यू झाला आहे. सदर प्रकरणी मयत लक्ष्मी हिची मैत्रीण अफसाना अलताफ शेख (२४) हिने शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असता पोलिसांनी पती रामरतन सुखलाल भारती यास अटक केली आहे.

टॅग्स :Bhiwandiभिवंडीthaneठाणे