शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांमधील माणूसकीने वाचविले गरोदर महिलेचे प्राण

By जितेंद्र कालेकर | Updated: July 28, 2023 19:35 IST

पोलिस निरीक्षकाच्या आवाहनानंतर दोन पोलिसांनी केले तात्काळ रक्तदान:वाहतूक शाखेचे असेही कर्तव्य

जितेंद्र कालेकर, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: एरव्ही, केवळ आपल्या हद्दीत गुन्हा घडला नसल्याने तो दाखल करण्याला विलंब करणारे किंवा लहान अपराधासाठी चिरीमिरी घेणारे पोलिसही अनेकांनी पाहिले असतील. परंतू, ठाण्यात एका गरोदर महिलेला तातडीने रक्ताच्या दोन बॅगांची गरज असल्याची माहिती मिळताच आपला तो प्रांतच नसल्याची सबब पुढे न करता ठाणे शहर वाहतूक शाखेच्या नौपाडा युनिटच्या दोन अंमलदारांनी तातडीने रक्तदान करुन या महिलेसह तिच्या बाळाचेही प्राण वाचविल्याने या दोघांचेही कौतुक होत आहे.

तीन हात नाका जंक्शन येथे भिवंडीतील कशेळी येथील एक मजूर सुनील शिंदे हे अचानक वाहतूक नियंत्रण शाखेचे नौपाडा युनिटचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामचंद्र मोहिते यांना भेटले. त्यांची पत्नी गरोदर असून तिला प्रसूती करण्यासाठी कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल केले आहे. रक्त कमी असल्यामुळे प्रसूतीनंतर ितला दोन बॅग रक्ताची तातडीची आवश्यकता आहे. त्यामुळे रक्तदाते देऊन मदत करावी, अशी कळकळीची विनंती त्याने मोहिते यांना केली. त्याची गरज आणि गांभीर्य लक्षात घेऊन अनोळखी असलेल्या शिंदे यांना मदत करण्यासाठी नौपाडा वाहतूक युनिटच्या सर्व अंमलदार यांना ही माहिती देऊन रक्तदानासाठी आवाहन केले.

या अंमलदारांपैकी अतुल डहाळे आणि सूरज जाधव या दोघांनीही तयारी दर्शविल्यानंतर त्यांना तात्काळ रक्तदान करण्यासाठी पाठविण्यात आले. इतर अंमलदारांनी या कार्यासाठी मदत केली. या महिलेचे ओ पाॅ िझटिव्ह हा रक्तगट हाेता. तर जाधव यांचाही हाच गट हाेता. डहाळे यांचा एबी पाॅझिटीव्ह गट हाेता. डहाळे यांचा गट जुळला नसला तरी त्यांनी रक्तदान केल्याने त्यांना एक बॅग िमळाली. त्यात जाधव यांची बॅग मिळाली. दरम्यान, तिची प्रसुती हाेउन मुलगाही झाला. दाेघांनीही वेळीच रक्त दान केल्याने प्रसुतीनंतर तिच्यासह बाळाचाही जीव वाचला. कोणत्याही वरिष्ठ नेता किंवा अधिकार्याने शिफारस केलेली नसतांनाही पोलिसांनी इतक्या तातडीने केलेल्या या मदतीने शिंदे कुटूंबीय चांगलेच भारावले. त्यांनी ठाणे शहर पोलिसांचे आभार व्यक्त केले. आम्ही केवळ आमचे कर्तव्य केले. यातून वेगळे समाधान मिळाले, अशी प्रतिक्रीया पोलिस निरीक्षक मोहिते यांनी लोकमत जवळ व्यक्त केली.

टॅग्स :thaneठाणे