शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

केंद्र सरकारविरोधात आयएमएच्या धिक्कार दिनाला डोंबिवलीत प्रचंड प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2018 15:33 IST

केंद्र शासनाच्या नॅशनल मेडीकल कमीशन बीलाविरोधात निषेध करण्यासाठी इंडियन मेडीकल असोसिएशनच्या डोंबिवली शाखेच्या वतीने शनिवारी नो वर्क करत धिक्कार दिन पाळण्यात आला. संस्थेच्या डोंबिवली शाखेच्या वतीनेही सकाळी ६ ते संध्याकाळी ६ या वेळेत वैद्यकीय सेवा बंद ठेवण्यात आली. कल्याणमध्येही नीदर्शने करण्यात आली.

ठळक मुद्दे पंतप्रधान नरेंद्र मोदी वेळ देत नाहीत  नॅशनल मेडिकल कमीशन विधेयकाला विरोध

डोंबिवली: केंद्र शासनाच्या नॅशनल मेडिकल कमीशन बीलाविरोधात निषेध करण्यासाठी इंडियन मेडिकल असोसिएशनच्या डोंबिवली शाखेच्या वतीने शनिवारी नो वर्क करत धिक्कार दिन पाळण्यात आला. संस्थेच्या डोंबिवली शाखेच्या वतीनेही सकाळी ६ ते संध्याकाळी ६ या वेळेत वैद्यकीय सेवा बंद ठेवण्यात आली. कल्याणमध्येही नीदर्शने करण्यात आली. या दोन्ही शहरांमधील सुमारे ८०० डॉक्टरांनी सहभाग घेत सुमारे ३५० दवाखाने, इस्पितळ बंद ठेवण्यात आली होती.डोंबिवली शाखेच्या अध्यक्षा डॉ. अर्चना पाटे यांनी यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. त्यामुळे त्या कालावधीत रूग्णांची गैरसोय होऊ शकते, पण त्याला आयएमए जबाबदार नसून केंद्र सरकारचे धोरण जबाबदार असल्याचे सांगण्यात आले. वैद्यकिय सेवा बंद ठेवून केंद्र शासनाच्या मनमानी कारभाराचा निषेध करण्यात आला. एनए.एम.सी बील हे नागरिकांवर लादण्यात येत आहे अशी टिका डॉ. पाटे यांनी केली. हे बील जनविरोधी, गरिबांच्या विरोधी असल्याचे त्या म्हणाल्या. केवळ श्रीमंतासाठी हा आरक्षण कायदा असल्याने त्याचा धिक्कार करण्यात येत आहे. या विधेयकातील चुकांसंदर्भात वेळोवेळी आम्ही खासदारांच्या बैठका घेतल्या, केंद्र सरकारच्या वैद्यकीय सेवांसंदर्भातील सचिव, मंत्र्यांसमवेत चर्चा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी वेळ देत नाहीत, त्यांची भेट व्हावी यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. पण आमच्या पदाधिका-यांशी कोणतीही चर्चा न करतात ते विधेयक कायम करण्यात येत असल्याने आम्ही नाराज आहोत. सोमवारी हे विधेयक पुन्हा लोकसभेत चर्चेला येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली, त्यामुळे अत्यंत तातडीने देशभर धिक्कार दिन पाळुन केंद्र सरकारला यासंदर्भात संदेश देण्याचा प्रयत्न असल्याचे आयएमएचे राष्ट्रीय सचिव डॉ. मंगेश पाटे यांनी सांगितले. रुग्णसेवा हाच आमचा धर्म आहे, हे जरी आम्हाला मान्य असले तरीही सर्वसामान्यांच्या दृष्टीने हे विधेयक योग्य नसून ते खर्चिक होणार आहे. खाजगी वैद्यकिय शिक्षणाची फी प्रचंड असतांनाच १५ टक्के जागा मॅनेजमेंट कोट्याच्या असतात. आता एनएमसी विधेयकामध्ये १५ टक्के ऐवजी ५० टक्के जागा मॅनेजमेंटला दिल्या आहेत. त्यामुळे हे विधेयक केवळ श्रीमंतांसाठी असल्याचे सिद्ध होत असल्याचा आरोप डॉ. पाटेंनी केला. त्यावेळी डोंबिवली शाखेच्या डॉ. वंदना धाकतोडे, खजिनदार डॉ. सुनित उपासनी, डॉ. संजय पृथ्वी, डॉ. विजय आगे आदींसह मान्यवर उपस्थित होते.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीdocterडॉक्टरdombivaliडोंबिवली