शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात यशोधननगर भागात गॅस वाहिनीला भीषण आग: सुदैवाने जिवित हानी टळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2020 23:54 IST

यशोधननगर भागातील रुणवाल प्लाझा इमारतीजवळ महानगर गॅसची वाहिनीतून गळती होऊन याठिकाणी मंगळवारी दुपारी मोठी आग लागली होती. ठाणे अग्निशमन दल आणि महानगर गॅसच्या पथकाने अर्ध्या तासांच्या अथक प्रयत्नातून या आगीवर नियंत्रण मिळवले. सुदैवाने यात कोणतीही जिवितहानी झाली नाही.

ठळक मुद्देअर्ध्या तासांच्या प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रणशेकडो रहिवाशी बचावले

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: यशोधननगर भागातील रुणवाल प्लाझा इमारतीजवळ असलेल्या उद्यानातील कचऱ्याला लागलेल्या आगीमुळे महानगर गॅसची वाहिनीतून गळती होऊन याठिकाणी मंगळवारी दुपारी मोठी आग लागली होती. ठाणे अग्निशमन दल आणि महानगर गॅसच्या पथकाने अर्ध्या तासांच्या अथक प्रयत्नातून या आगीवर नियंत्रण मिळवले. सुदैवाने यात कोणतीही जिवितहानी झाली नाही.यशोधननगर येथे कोरस टॉवर संकुलाच्या मागील बाजूला असलेल्या एका उद्यानात ठाणे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी काही कामासाठी काही दिवसांपूर्वी एक मोठा खड्डा खोदला होता. या खड्डयात पालापाचोळयांचा मोठा कचरा भरला गेला होता. या कच-याला २ जून रोजी दुपारी १.३० वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. आगीने मोठे स्वरुप धारण केल्यामुळे या खड्डयामध्येच खाली असलेली महानगर गॅसची वाहिनी गरम होऊन अर्धा एमएम फुटली. त्यातून गॅस बाहेर आल्यामुळे आगीने एकदम रौद्र रुप धारण केले. ही माहिती मिळतातच ठाणे महापालिकेचे वागळे इस्टेट अग्निशमन दलाचे जवान, आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि महानगर गॅसच्या शीघ्रकृती दलानेही तातडीने धाव घेतली. एका बाजूने अग्निशमन दलाने पाण्याचा मारा करीत आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. तर दुसºया बाजूने महानगर गॅसचे प्रभारी जिल्हा प्रमुख नितीन पेडणेकर यांच्या पथकाने त्याच भागात असलेला गॅस पुरवठा बंद केला. त्यानंतर अवघ्या काही वेळातच ही आग आटोक्यात आली. यावेळी बघ्यांचीही मोठी गर्दी जमा झाली होती. वर्तकनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय गायकवाड, निरीक्षक संतोष घाटेकर आणि ठाणे महापालिकेचे शिवसेना गटनेते दिलीप बारटक्के यांनीही घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

‘‘ रुणवाल प्लाझासमोर असलेल्या कच-यामुळे ही आग लागली. तातडीने गॅस पुरवठा बंद केल्यानंतर आगीवर नियंत्रण आले. या भागात २५ ते ३० घरांसाठीचा गॅस काही काळ बंद केला होता. तो आता पूर्ववत केला आहे.’’नितीन पेडणेकर, जिल्हा प्रभारी अधिकारी, महानगर गॅस, ठाणे

 

टॅग्स :thaneठाणेfireआगtmcठाणे महापालिका