शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

बारावीची परीक्षा मंगळवारपासून; जिल्ह्यातून ९६ हजार १८१ विद्यार्थी

By admin | Updated: February 25, 2017 03:04 IST

ठाणे, पालघर जिल्ह्यातील एक लाख ३३ हजार ८२६ विद्यार्थी बारावीच्या परीक्षेला बसले आहेत. २८ फेब्रुवारीपासून ही परीक्षा सुरू होणार आहे.

ठाणे : ठाणे, पालघर जिल्ह्यातील एक लाख ३३ हजार ८२६ विद्यार्थी बारावीच्या परीक्षेला बसले आहेत. २८ फेब्रुवारीपासून ही परीक्षा सुरू होणार आहे. तत्पूर्वी ठिकठिकाणी सुमारे १७ दिवसांपासून सुरू असलेल्या प्रात्यक्षिक परीक्षा २५ फेब्रुवारीला संपणार आहेत.या प्रात्यक्षिक परीक्षा ठाणे जिल्ह्यातील १४८ केंद्रांवर तर पालघर जिल्ह्यातील ३५ केंद्रांवर घेण्यात आल्या. यासाठी प्रत्येकी एक केंद्र संचालक व परीक्षकांच्या नियंत्रणात या दोन्ही जिल्ह्यात प्रात्यक्षिक पार पडले आहेत. यामध्ये विज्ञान शाखेच्या सर्वाधिक विद्यार्थ्यांचा समावेश होता. यानंतर माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणारी १२ वीची परीक्षा २५ मार्चपर्यंत सुरू राहणार आहे या परीक्षेसाठी कला, विज्ञान, वाणिज्य आणि एमसीव्हीसी या शाखांचे एक लाख ३३ हजार ८२६ परीक्षार्थी या दोन्ही जिल्ह्यातील आहेत. यापैकी ठाणे जिल्ह्यामधील ९६ हजार १८१ विद्यार्थी आहेत. यामध्ये कला शाखेचे १६ हजार ५९२, विज्ञानचे २९ हजार ४५०, वाणिज्यचे ४९ हजार ०५७ आणि एक हजार ८२ विद्यार्थी एमसीव्हीसी शाखेचे आहेत. याप्रमाणेच पालघर जिल्ह्यामधील १६ हजार ६७९ वाणिज्य शाखेचे सर्वाधिक विद्यार्थी आहेत, कलेचे दहा हजार ९३७, विज्ञानचे नऊ हजार ४८५ आणि एमसीव्हीच्या केवळ ५४४ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. (प्रतिनिधी)