शहरं
Join us  
Trending Stories
1
अयोध्येमध्ये सिलेंडरचा भीषण स्फोट, घर कोसळून ५ जणा्ंचा  मृत्यू, अनेक जण अडकल्याची भीती  
2
ओवेसींच्या सभेतून वारिस पठाण यांचं नितेश राणेंना आव्हान, म्हणाले, ‘दोन पायांवर येशील, पण…’ 
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या गळ्यात शांततेचं नोबेल, नेतन्याहू यांनी शेअर केला असा फोटो, म्हणाले…
4
"सामाजिक विषमता निर्माण करण्याला शरद पवार जबाबदार', मनोज जरांगेंच्या भेटीनंतर राधाकृष्ण विखेंचा आरोप 
5
आठव्या क्रमांकाच्या बॅटरनं वाचवलं; पण तोच डाव उलटा फिरला!.. अन् टीम इंडियासमोर आफ्रिकेनं मारली बाजी
6
'हो, ते प्रवासी विमान आम्ही पाडलं होतं', अनेक महिन्यांनंतर व्लादिमीर पुतीन यांची कबुली
7
मनात नसताना रोहित-विराट 'तो' निर्णय घेणार? मोठी माहिती आली समोर
8
CJI गवईंवर बूट फेकणाऱ्या वकिलाला शरद पवारांचे खासदार निलेश लंकेंनी दिल्लीत गाठले; त्यानंतर...
9
महिलेने रडत रडत केला फोन, पोलिसांना सांगितलं पतीचं गुपित, घराची झडती घेताच बसला धक्का 
10
क्रिकेटच्या मैदानात AI ची ‘बोलंदाजी’! मिताली राजनं पिच रिपोर्टसाठी घेतली गुगल ‘जेमिनी’ची मदत, अन्...
11
आता भारतातच मिळणार जागतिक दर्जाचे शिक्षण; ब्रिटनची 9 विद्यापीठे उघडणार कॅम्पस
12
UNSC मध्ये भारताला ब्रिटनचा पाठिंबा! मुक्त व्यापार करारावर शिक्कामोर्तब; खलिस्तानवाद्यांवर कारवाईची मागणी
13
रस्त्यावर बेशुद्ध अवस्थेत सापडली महिला; शुद्धीवर आल्यावर सांगितलं असं; ऐकून सगळेच चक्रावले!
14
शाब्बास रिचा! सेंच्युरी हुकली; पण 'नॉट रिचेबल' वाटणारा टप्पा गाठला अन् मोठा डावही साधला
15
रावळपिंडी चिकन टिक्का, बहावलपूर नान, तर..., हवाई दलाच्या मेन्यू कार्डमधून पाकिस्तानची खिल्ली
16
शुभमन गिलच्या कर्णधारपदावर सौरव गांगुलींचे मोठे विधान, म्हणाला...
17
वारंवार मागणी केल्याने डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल शांतता पुरस्कार मिळेल? शर्यतीत कोण? जाणून घ्या...
18
'आम्ही सगळेच स्तब्ध झालो होतो, पण आता...', बूट फेकण्याच्या घटनेवर CJI गवई स्पष्टच बोलले
19
रोहित पवारांच्या मातोश्रींकडून गुंड निलेश घायवळचे कौतुक; सचिन घायवळसोबतचेही फोटो आणले समोर
20
Crime: एकाच कुटुंबातील तिघांवर प्राणघातक हल्ला, ५०० सीसीटीव्हीच्या मदतीने हल्लेखोराला अटक

एचएसबीसी कंपनीला ३५ हजार रुपयांचा दंड

By admin | Updated: March 31, 2017 05:54 IST

क्रेडिटकार्ड सुविधेसंदर्भात ग्राहकाला अतिरिक्त शुल्क आकारून त्रुटीची सेवा देणाऱ्या एचएसबीसी बँकिंग कंपनीला जिल्हा

ठाणे : क्रेडिटकार्ड सुविधेसंदर्भात ग्राहकाला अतिरिक्त शुल्क आकारून त्रुटीची सेवा देणाऱ्या एचएसबीसी बँकिंग कंपनीला जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाने ३५ हजारांचा दंड सुनावला आहे.डोंबिवली येथील अशोक सप्रे यांनी एचएसबीसी कंपनीकडून क्रेडिटकार्डची सुविधा घेतली होती. २००८ मध्ये कार्ड हरवल्यावर सप्रे यांनी कंपनीला कळवल्यावर त्यांना नवीन क्रेडिटकार्ड देऊन कार्डाची फी आकारली. इतर रकमेची स्टेटमेंट पाठवली. कंपनीने १०० रुपयांची मागणी केली. तर, सप्रे यांनी २०० रुपये दिल्यावरही थकीत रकमेच्या नावाखाली पैसे मागितले. पुन्हा ५०० रुपये दिल्यावर संपूर्ण रकमेची मागणी रद्द होईल, असे कंपनीच्या प्रतिनिधीने सांगितले. ते दिल्यानंतरही पुन्हा पैसे मागितले. हे सर्व त्यांनी कंपनीला सांगितल्यावरही पैशांची मागणी चालू राहिली. त्यामुळे त्यांनी कंपनीविरोधात मंचाकडे तक्रार दाखल केली. तर, सप्रे यांना आणि त्यांच्या भावाला दोघांनाही कार्ड त्यांच्याच विनंतीवरून दिले होते. त्या दोन्हीचे वार्षिक शुल्क होते. मात्र, शुल्क न भरल्याने थकीत रकमेवर व्याज, दंडव्याज वाढत गेले. सप्रे यांनी केवळ ५०० रुपये दिले. फेब्रुवारी २०११ अखेरपर्यंत १२ हजार ९५३ रुपये तक्रारदारांकडून येणे होते. त्यांना अटी व शर्तींनुसार रक्कम आकारली असून त्यांची तक्रार फेटाळावी, अशी मागणी कंपनीच्या वतीने करण्यात आली.कागदपत्रे, पुरावे यांची पडताळणी केली असता सप्रे यांनी स्वत:करिता क्रेडिट व भावासाठी अ‍ॅडआॅनकार्डची मागणी केल्याचे अर्जामध्ये दिसते. तर, अर्जावर ५० टक्के अ‍ॅन्युअल फी असा शिक्का आहे. यावरून, वार्षिक शुल्काच्या ५० टक्के रक्कम देण्याच्या अटीवर त्यांना कार्ड दिले होते. अर्जावर क्रेडिट आणि अ‍ॅडआॅनकार्डसाठी अनुक्रमे ७०० आणि ३५० रुपये नमूद आहे. ५० टक्के सवलतीच्या दराप्रमाणे त्याच्या अर्धे म्हणजे ३५० आणि १७५ रुपये मागणे आवश्यक होते. मात्र, ५० टक्के सवलत देऊनही कंपनीने सप्रे यांच्याकडे फेब्रुवारी २०११ पर्यंतचे वार्षिक शुल्क १०० टक्क्यांप्रमाणे १२९३२ रुपये मागितले. (प्रतिनिधी)सुविधेप्रमाणे मे २००८ पर्यंत ४६४ रुपयेच सप्रे यांच्याकडून येणे होते. मात्र, १०० टक्के शुल्क आकारून कंपनीने त्यात अनेक पटीने वाढ करून नियमांचा भंग केला व सप्रे यांना त्रास दिला, असे मंचाने स्पष्ट केले. त्यामुळे एचएसबीसी कंपनीने सप्रे यांना नुकसानभरपाई व तक्रार खर्च मिळून ३५ हजार द्यावेत, असे आदेश मंचाने दिले आहेत.