शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात अ‍ॅथलेटस घडणार तरी कसे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2018 04:27 IST

ठाण्यात सोयीसुविधा नसतानाही चांगले अ‍ॅथलेट्स घडत आहेत. परंतु मागील काही वर्षांमध्ये त्यांची संख्या रोडावली आहे. ठाणे जिल्ह्यासाठी स्पर्धा घ्यायची वेळ आली, तर ती मुंबईत घ्यावी लागते. ठाणे शहरासाठी ही मोठी शोकांतिकाच म्हणावी लागेल. दादोजी कोंडदेव क्रीडागृह अ‍ॅथलेटिक्ससाठी मागील तीन ते चार महिन्यांपासून बंद आहे. कौसा येथे आजही परवानगी दिली जात ...

ठाण्यात सोयीसुविधा नसतानाही चांगले अ‍ॅथलेट्स घडत आहेत. परंतु मागील काही वर्षांमध्ये त्यांची संख्या रोडावली आहे. ठाणे जिल्ह्यासाठी स्पर्धा घ्यायची वेळ आली, तर ती मुंबईत घ्यावी लागते. ठाणे शहरासाठी ही मोठी शोकांतिकाच म्हणावी लागेल. दादोजी कोंडदेव क्रीडागृह अ‍ॅथलेटिक्ससाठी मागील तीन ते चार महिन्यांपासून बंद आहे. कौसा येथे आजही परवानगी दिली जात नाही. तेथील ट्रॅक अ‍ॅथलेट्ससाठी उपयोगाचा नसल्याची खंत ठाण्यातील अ‍ॅथलेक्टिस कोच अजित कुलकर्णी यांनी व्यक्त केली आहे.

अ‍ॅथलेट्ससाठी ठाण्यात कोणत्याही सोयीसुविधा नसून ही परिस्थिती प्रशासनाच्या निदर्शनास आणण्याचा प्रयत्न अजित कुळकर्णी यांनी वेळोवेळी केला. ठाणे शहर स्मार्ट सिटीच्या दिशेने प्रवास करीत आहे. त्याअनुषंगाने ठाणेकरांना अनेक स्मार्ट सुविधा उपलब्ध होणार आहेत. परंतु ठाण्याने खेळाडूंच्या सुविधांसाठी म्हणावे तेवढे प्रयत्न केले नाहीत. दादोजी कोंडदेव क्रीडागृहात पूर्वी सिंथेटीक ट्रॅक उपलब्ध होता. आता त्याची दुरवस्था झाली असून, तो सराव करण्यायोग्य राहिलेला नाही. तीन ते चार महिन्यांपासून क्रिकेटसाठी या ट्रॅकचा वापर होत असून, संपूर्ण स्टेडिअमच अ‍ॅथलेट्ससाठी बंद करण्यात आले आहे. मुंब्य्रातील कौसा येथे मोठ्या दिमाखात स्टेडिअम उभारले आहे. तेथील ट्रॅकचा वापर केवळ मॉर्निंग वॉकसाठी होत असून, सरावासाठी अद्यापही तिथे परवानगी दिलेली नाही. महत्प्रयासाने एकदाच त्याठिकाणी सरावाची संधी मिळाली होती. परंतु ठाण्यातील खेळाडूंना तिथे जाण्या-येण्यातच चार तास घालवावे लागले. प्रवासातच एवढा वेळ जात असेल, तर त्यांनी सराव कधी करावा, असा सवाल उपस्थित होत आहे. त्यामुळे ठाण्यातील खेळाडूंना मुंबईला किंवा पुण्यातील बालेवाडीला नाईलाजाने जावे लागते. त्यातही काही अडचणी आहेत.

मुंबई विद्यापीठात सरावाला गेल्यास तिथे प्रथम प्राधान्य त्यांच्या विद्यार्थ्यांना दिले जाते. एकूणच ठाण्यात चांगले अ‍ॅथलेट्स घडू शकतात. परंतु त्यांना सराव करण्यासाठी जागा आणि पूरक सोयीसुविधासुध्दा उपलब्ध नाहीत. मागील ११ वर्षांपासून अ‍ॅथलेट्ससाठी सोयीसुविधा मिळाव्यात यासाठी आम्ही प्रशासनाकडे पाठपुरावा करत आहोत. परंतु त्याला यश मिळाले नाही. काही महिन्यांपूर्वी ठाणे जिल्ह्याची स्पर्धा घेण्यात आली होती. ही स्पर्धा ठाण्यात होणे अपेक्षित होते. परंतु ती सोयीसुविधांअभावी मुंबईला घ्यावी लागली. ही अतिशय लाजिरवाणी बाब आहे. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, बहुतांश पालक मुलांच्या क्रीडागुणांना महत्त्व देण्याऐवजी अभ्यासावरच जोर देतात. याशिवाय खेळाडूंना नोकरीच्या संधी कमी आहेत. एलआयसीमध्ये खेळाडूंना संधी मिळते, रेल्वेत बऱ्याच मर्यादा आहेत. नोकरीच्या संधी वाढविण्याची गरज आहे. शहरी भागात सोयीसुविधा आणि तंत्रज्ञान उपलब्ध नसल्याने आम्ही मित्रमंडळीसह ग्रामीण भागात जाऊन खेळाडूंना तयार करण्याचे प्रयत्न करीत असल्याचे अजित कुळकर्णी यांनी सांगितले.अजित कुलकर्णींची खंतठाण्यातील अ‍ॅथलेट्समध्ये भरपूर ऊर्जा आहे. उच्च दर्जाचे खेळाडू येथे घडू शकतात. या माध्यमातून क्रीडा क्षेत्रात ठाण्याचा नावलौकिक होऊ शकतो. मात्र त्यासाठी खेळाडूंना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याची गरज आहे.

टॅग्स :thaneठाणे