शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

वारेमाप वीजबिले आली कशी?- रवींद्र चव्हाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2020 00:33 IST

महावितरणच्या विभागीय अभियंत्यांकडे विचारणा

डोंबिवली : वाढीव वीजबिले, सतत वीजपुरवठा खंडित होणे, यामुळे नागरिक त्रस्त आहेत. ज्यांना ५०० रु पये बिल येत होते, त्यांना आता पाच हजार रुपये बिल येत आहे. अशी वारमाप वीजबिले कशी येत आहेत? त्यामुळे एखादी चांगली योजना आणून त्यांना दिलासा द्या. विजेच्या संदर्भात दिल्ली पॅटर्न राबवणार असल्याची घोषणा या राज्य सरकारने केली होती. ही घोषणा कागदावर राहिली का, असा सवाल आमदार रवींद्र चव्हाण यांनी केला.वीजसमस्या, वीजबिलांबाबत चव्हाण यांनी गुरुवारी महावितरणच्या कल्याण येथील तेजश्री कार्यालयात विभागीय अभियंता दिनेश अग्रवाल यांची भेट घेऊन त्यांना जाब विचारला.यावेळी चव्हाण म्हणाले, विविध समस्यांसंदर्भात आम्ही महावितरणला पत्रे पाठवली, पण त्याला उत्तरही मिळत नाही. प्रत्येक बैठकीचे आम्हाला इतिवृत्त हवे आहे. महावितरणने बिल भरण्यासाठी ग्राहकांना तगादा लावणे चुकीचे आहे. खंबाळपाडा, कांचनगाव येथे दिवसातून सात वेळा वीज खंडित होते. मी राज्यमंत्री असताना अखंड वीजपुरवठ्यासाठी मेरी गो राउंड पद्धतीने सर्व व्यवस्था केली, पण त्याची अंमलबजावणी होत नाही. वीज खंडित होण्याचा अहवाल आम्हाला हवा. विजेअभावी नागरिकांना घरून कामे करता येत नाहीत. याप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांची बदली करावी, अशी मागणी चव्हाण यांनी केली.त्यावर अग्रवाल म्हणाले की, खंबाळपाडा विभागात सात ठिकाणी समस्या येत आहे. त्याबाबत गणेशोत्सवापूर्वी काम पूर्ण करण्यात येणार आहे. त्याकरिता शुक्र वारी दिवसभर शटडाउन घेण्यात येणार आहे.गणेशोत्सवात कोणाचेही वीजमीटर काढू नकाभाजपचे जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे यांनी उपअभियंता अधिकारी नितीन दुपहारे यांची तातडीने बदली करावी, अशी मागणी केली.गणेशोत्सवात वीजबिलांमुळे कुणाचेही मीटर काढल्यास, त्यामुळे होणाºया परिणामांना केवळ महावितरण जबाबदार असेल, असा इशारा त्यांनी दिला.यावेळी खंबाळपाडा प्रभागाचे नगरसेवक साई शेलार यांनीही नागरिकांच्या समस्या मांडल्या.

टॅग्स :electricityवीज