शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

वॉर्डन चार महिने मानधनाविना, संसाराचा गाडा हाकायचा कसा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2019 05:36 IST

कुटुंब हवालदिल : संसाराचा गाडा हाकायचा कसा?

उल्हासनगर : शहरातील वाहतूककोंडी सोडवण्यासाठी पोलिसांना मदत करणारे वॉर्डन मागील चार महिन्यांपासून मानधनापासून वंचित आहेत. पालिकेकडून वेळेत पगार होत नसल्याने वॉर्डन यांच्या कुटुंबाची वाताहत होत असून वेळेत मानधन देण्याची मागणी वाहतूक विभागाने केली आहे.

उल्हासनगरातील बहुतांश रस्ते अरुंद असल्याने वाहतूककोंडीचा प्रश्न ऐरणीवर आला होता. नागरिकांनादिलासा देऊन वाहतूककोंडी सोडवण्यासाठी वाहतूक विभागाने महापालिकेला वॉर्डन देण्याची मागणी केली होती. त्यानुसार, पालिकेने वाहतूक विभागाला ४० व त्यानंतर एकूण ७५ वॉर्डन नियुक्तीला वाहतूक विभागाला परवानगी दिली. एका वॉर्डनला दरमहा चार हजार मानधन सुरुवातीला दिले जात होते. मात्र, ते पुरेसे नसल्याची मागणी वाहतूक विभागाकडून आल्यावर तीन महिन्यांपूर्वी मानधन चारवरून सहा हजार करण्यात आले. महापालिकेकडून दरमहा मानधन दिले जात नसल्याने वॉर्डनच्या कुटुंबाची वाताहत होत असल्याची माहिती वाहतूक विभागाने दिली.महापालिका वाहन विभागाचे व्यवस्थापक यशवंत सगळे यांनी वॉर्डन यांचे दरमहिन्याला मानधनाचे बिल लेखा विभागाकडे पाठवत असल्याची माहिती दिली. तर, मुख्य लेखा अधिकारी विकास चव्हाण यांच्याशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.शहर वाहतूक विभागाचे सहायक आयुक्त प्रदीप गोसावी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक घेटे यांनी वॉर्डनचे मानधन दरमहा काढण्याची विनंती पालिकेकडे केली आहे. महापालिकेने ७५ वॉर्डनबरोबरच जॅमर व इतर सुविधा वाहतूक विभागाला दिल्या आहेत. मात्र, कोंडी सुटण्याऐवजी परिस्थिती ‘जैसे थे’ असल्याची खंत व्यक्त केली जात आहे. वॉर्डनचा ड्युटी अहवाल वाहतूक पोलीस विभाग पालिकेला नियमित देत नसल्याचे वाहतूक व्यवस्थापक यशवंत सगळे यांनी सांगितले.चौक, गर्दीच्या ठिकाणाहून वॉर्डन गायबमहापालिकेने शहरातील वाहतूककोंडी सोडवण्यासाठी तब्बल ७५ वॉर्डन घेण्यास वाहतूक विभागाला परवानगी दिली. मात्र चौक, रस्ते, गर्दीची ठिकाणे, मुख्य बाजारपेठा, शाळा-महाविद्यालये आदी ठिकाणी वॉर्डनची नेमणूक केली. मात्र, बहुतांश ठिकाणचे वॉर्डन गायब असल्याचे चित्र शहरात आहे.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर