शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

सराफ संघर्षाची गुढी उभारणार?

By admin | Updated: April 8, 2016 01:26 IST

देशभर सराफांचा संप सुरु असतानाच वसईतील मोठ्या सराफांनी ऐन गुढीपाडव्याच्या तोंडावर संपातून माघार घेऊन दुकाने सुरु केल्याने वसईतील सराफ संघटनेने संताप

विरार : देशभर सराफांचा संप सुरु असतानाच वसईतील मोठ्या सराफांनी ऐन गुढीपाडव्याच्या तोंडावर संपातून माघार घेऊन दुकाने सुरु केल्याने वसईतील सराफ संघटनेने संताप व्यक्त केला असून प्रेमाने ऐकत नसतील तर दुसऱ्या प्रकाराने वठणीवर आणण्याशिवाय पर्याय नाही असा इशारा दिला आहे. त्यामुळे उद्या वसई व पालघर जिल्ह्यात मोठे सराफ ंविरुद्ध छोटे सराफ असा संघर्ष उफाळून येण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारच्या धोरणाच्या विरोधात सराफांनी बेमुदत संप पुकारला आहे. या संपात वसईसह पालघर जिल्ह्यातील १८०० सराफ सामील झाले आहेत. नवघर-माणिकपूर शहरात मुंबईतील पाच मोठ्या सराफांची दुकाने आहेत. मध्यंतरी पाचही सराफांनी संपात सहभाग घेतला होता. मात्र गुढीपाडव्याच्या तोंडावरच या पाच सराफांनी संपातून माघार घेत दुकाने दुकाने पुन्हा सुरु केली आहेत. इतर सराफांचा संप मात्र सुुरुच आहे.केंद्र सरकारच्या धोरणाचा सर्वच दुकानदारांना फटका बसणार आहे. मोठ्या सराफांना विनंती केली तेव्हा त्यांनी संपात सहभाग घेतला होता. मात्र, गुढीपाडव्यामुळे त्यांनी दुकाने पुन्हा सुरु केली आहेत. त्यामुळे वसईत त्यांच्याविरोधात संताप व्यक्त केला जात आहे. पुन्हा एकदा त्यांना प्रेमाने समजावून पाहिले जाईल. त्यांनी ऐकले नाही तर दुसऱ्या भाषेत धडा शिकवावा लागेल, असा इशारा वसई ज्वेलर्स असोसिएशनचे अध्यक्ष विरेंद्र बोरा यांनी लोकमतशी बोलताना दिला. त्यामुळे पालघर जिल्ह्यात पोलिसांपुढे उद्या कायदा व सुव्यवस्था राखण्याचे आव्हान उभे ठाकले आहे.