शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

बंद कंपन्यांच्या जागेत घरे आणि कार्यालये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2018 06:24 IST

बीएसयूपीची घरे मर्यादित असल्याने तसेच रेंटलच्या घरांतील असुविधांमुळे तेथे जाण्यास कोणी तयार नसल्याने बंद पडलेल्या कंपन्यांच्या भूखंडांचा पर्याय पुढे आला आहे.

ठाणे : ठाण्यात येऊ घातलेली क्लस्टर योजना आणि रस्ता रुंदीकरणामध्ये भविष्यात बाधित होणाऱ्या नागरिकांच्या निवाºयाच्या प्रश्नाचा विचार करून बंद पडलेल्या कंपन्या तसेच रिकाम्या औद्योगिक भागाचे रूपांतर वाणिज्य आणि निवासी भागात करण्याची सभागृह नेते नरेश म्हस्के यांची सूचना महासभेत मान्य होऊन तसा ठरावही मंजूर झाल्याने या जमिनींवर घरे, कार्यालये, अन्य व्यापारी संकुले बांधण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.आॅक्टोबरपासून क्लस्टर योजनेच्या पहिल्या टप्प्याला सुरु वात होणार आहे. त्यानंतर, टप्प्याटप्प्याने शहरात ही योजना लागू करण्यात येणार असल्याने तेथील रहिवाशांच्या तात्पुरत्या निवाºयाचा प्रश्न निर्माण होणार आहे. बीएसयूपीची घरे मर्यादित असल्याने तसेच रेंटलच्या घरांतील असुविधांमुळे तेथे जाण्यास कोणी तयार नसल्याने बंद पडलेल्या कंपन्यांच्या भूखंडांचा पर्याय पुढे आला आहे. त्याला ठाणे शहरातील वाणिज्य आस्थापनांच्या कमतरतेची जोड देण्यात आली आहे. या बंद झालेल्या कंपन्या वा रिकाम्या औद्योगिक विभागाचे वाणिज्य भागात रूपांतर केल्यास नवा रोजगार तयार होईल, असा मुद्दा मांडून विकास नियंत्रण नियमावलीतील परिशिष्ट एम कलम एम-६.१ मध्ये सुधारणा करण्याच्या प्रस्तावाची सूचना म्हस्के यांनी दिली होती. त्यात औद्योगिक विभागाचे वाणिज्य भागात रूपांतर करताना ३३ टक्के निवासी वापरासाठी, ३३ टक्के वाणिज्य वापरासाठी- यात आॅफिसेस, आयटी पार्क , क्लासेस, हॉस्पिटल, लॅबोरेटरीज, कमर्शियल आॅफिसेस यासाठी, तर ३३ टक्के प्रकल्पग्रस्त म्हणजेच क्लस्टर योजना (समूहविकास योजना) राबवताना होणारे विस्थापित तसेच भविष्यात होणारे रस्ता रुंदीकरण, महापालिकेच्या प्रकल्पात बाधित होणाºया नागरिकांसाठी घरे राखून ठेवणे, असा हा फेरबदल असल्याचे म्हस्के यांनी सांगितले. यामुळे ठाणे शहरातील मोठमोठे औद्योेगिक विभाग- उदा. रेमण्ड, ग्लॅक्सो, युनिअबेक्स तसेच मफतलाल कंपनी अशा प्रकारच्या अनेक बंद कंपन्यांचे निवासी भागात रूपांतर होण्याची दाट शक्यता आहे. त्यांचे प्लान मंजूर करताना प्रस्तावाच्या सूचनेप्रमाणे व्हावे, अशी मागणी त्यांनी केली. प्रकल्पग्रस्तांच्या घरांच्या बदल्यात मिळणारा टीडीआर वाणिज्य आणि निवासी कामासाठी वापरणे शक्य होणार असल्याने विकासकाचे कुठलेही नुकसान होणार नाही, असा दावा त्यांनी केला.

ठाणे पालिका क्षेत्रात मोठ्या प्रमाणात समूहविकास योजना (क्लस्टर), रस्ता रुंदीकरण, महापालिका प्रकल्प, मेट्रो, मोनो हे प्रकल्प राबवण्यात येणार असल्याने रहिवासी मोठ्या प्रमाणात विस्थापित होतील. त्यांची पर्यायी व्यवस्था करणे आवश्यक आहे. त्यासाठी बीएसयूपीच्या घरांची कमतरता आहे. ट्रान्झिट कॅम्पसाठी-संक्रमण शिबिरे भूखंड कमी आहेत. त्यामुळे ती घरे, व्यावसायिक व व्यापारी संकुले उभारल्यास मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होणे, याचा विचार करून या बदलाची अंमलबजावणी करण्याची मागणी त्यांनी केली.

टॅग्स :thaneठाणे