शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

खासगी कंपन्यांच्या जागेवर उभारणार रुग्णालये'; महामंडळाचे कोट्यवधी रुपये होणार खर्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2020 00:18 IST

भूखंड जैसे थे करून द्यावे लागणार

ठाणे : ठाणे महापालिका सिडको, म्हाडासह एमएमआरडीएच्या माध्यमातून कोट्यवधी रुपये खर्चून जी पाच रुग्णालये उभारणार आहे, ती खासगी कंपन्यांच्या जागेवर उभी राहणार आहेत. यामुळे त्यासाठी जागेचे भाडे तर द्यावे लागणारच, शिवाय साथ ओसरल्यानंतर ती पुन्हा तोडून संबंधित कंपन्यांचा भूखंड जैसे थे करून परत द्यावे लागणार आहेत.

या पाचपैकी बुश कंपनीच्या जागेवर महापालिकेच्या माध्यमातून ४५६ बेडच्या रुग्णालयाचे काम पूर्ण झाले आहे. तर, व्होल्टास कंपनीच्या जागेवर न्यू कोविड हॉस्पिटल सिडकोच्या माध्यमातून उभारण्यात येणार आहे. ते १,०८५ बेडचे असणार असून त्याची निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन कामाला सुरुवात झाली आहे. ज्युपिटर रुग्णालयाच्या बाजूला असलेल्या पार्किंग प्लाझाच्या ठिकाणी १,३५० बेडचे तिसरे रुग्णालय उभारण्याची मान्यता शासनस्तरावर असतानाही त्याचे काम सुरू झाले आहे. एमएमआरडीएच्या माध्यमातून ते उभारले जाणार आहे. तर, ग्लोबल इम्पॅक्ट हब येथे आणखी ३२० बेडच्या रुग्णालयासाठी निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून त्याचे काम सिडकोच्या माध्यमातून केले जाणार आहे. याशिवाय, घोडबंदर भागातील बोरिवडे येथेही ३०६ बेडचे रुग्णालय उभारले जाणार असून शासनस्तरावर हे काम असून निविदा प्रक्रिया सुरू झाली असली, तरी त्याआधीच कामाला सुरुवात झाली आहे. हे काम झी मीडिया, एमएमआरडीए आणि सिडकोच्या माध्यमातून केले जाणार आहे. या सर्व ठिकाणी वैद्यकीय, वैद्यकेतर कर्मचाऱ्यांची संख्या ४,९३४ असणार असून १,५९० तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध केले जाणार आहेत.अशी असणार बेडची संख्या : विविध ठिकाणी उभारल्या जाणाºया रुग्णालयांमध्ये ४,३३७ बेड असणार असून त्यातील १९८ आॅक्सिजनविरहित, आॅक्सिजनचे ३,०२४, आयसीयूचे एक हजार, व्हेंटिलेटरचे ९५ आणि कोविड डायलेसिसचे २० बेड असणार आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या