शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमधील पंचमहल यथे मोठा अपघात; पावागडमध्ये रोपवे कोसळला, 6 जणांचा मृत्यू
2
“PM मोदींच्या नेतृत्वाखालील सक्षम, नवीन भारत आपले परराष्ट्र धोरण स्वतः ठरवतो”: CM फडणवीस
3
एकनाथ शिंदे यांनी घेतली शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची भेट; म्हणाले, “अभिमानास्पद...”
4
गोपाळ शेट्टींसह मेहता, गुप्ता, मिश्रा अन् शर्मा यांच्यावर मुंबई भाजपानं दिली मोठी जबाबदारी
5
Asia Cup Record : सचिन तेंडुलकर भारताचा 'नंबर वन ऑलराउंडर'; जयसूर्याची तर गोष्टच न्यारी
6
अमेरिका निघाली होती रशियाला पंगू बनवायला, आता स्वतःवरच आली अंडी खरेदीची वेळ! ३२ वर्षांत पहिल्यांदाच...
7
CM फडणवीसांकडून ग्रीन सिग्नल मिळताच अजित पवार गटाला बसणार झटका?; भाजपा आमदार लागले कामाला
8
राज ठाकरेंना मिळणार खास मान...यंदाचा शिवसेनेचा 'दसरा मेळावा' ठाकरे बंधू गाजवणार?
9
जीएसटी कमी झाल्यानंतर, किती रुपयांवर येईल Maruti Baleno? किती रुपयांचा होईल फायदा? जाणून घ्या
10
जगातील सगळ्यात महागडी शाळा; वर्षाची फी तब्बल १,१३,७३,७८० रुपये! आहे तरी कुठे नक्की?
11
चंद्रग्रहण २०२५: तुमच्या राशीनुसार करा ‘हे’ दान, धनवान बनाल; कल्याण होईल, सुख-सुबत्ता लाभेल
12
"गणित जुळलं की...", अभिनेत्री ऋतुजा बागवे लग्नाबद्दल स्पष्टच बोलली
13
DCM अजित पवार अन् पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांच्यात नेमका काय झाला संवाद? वाचा शब्द न् शब्द
14
भारत, पाकिस्तान, अमेरिका अन् जपानमध्ये आपत्ती येणार; बाबा वेंगाची 'ती' भविष्यवाणी खरी होणार?
15
“...तोपर्यंत मराठा समाजाला कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण मिळणार नाही”: बाळासाहेब थोरात
16
५०० वर्षांनी चंद्रग्रहणात शुभ योग: ५ राशींचे पंचक सुटेल, लाभ मिळेल; ४ राशींनी सावध राहावे!
17
मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ‘हिट’, शेतकरी, धारावी पुनर्वसन आंदोलन याच मार्गाने जाणार?
18
“आज BJP आहे, उद्या बाजी पलटेल, काँग्रेस सत्तेत येईल”; कोणत्या नेत्यांनी व्यक्त केला विश्वास?
19
VIRAL : खोदकाम करताना सापडलं १९९७चं जलजीऱ्याचं पाकिट; पण सोशल मीडियावर का होतंय व्हायरल?
20
BCCI नं श्रेयस अय्यरला दिलं कॅप्टन्सीचं गिफ्ट; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेसाठी असा आहे भारतीय संघ

केडीएमसीचे वरातीमागून घोडे

By admin | Updated: October 12, 2016 04:21 IST

पावसाळ्यात साथीचे आजार पसरले असताना त्याकडे सोयीने दुर्लक्ष करणाऱ्या केडीएमसीने आता लांबलेल्या परतीच्या पावसात जलजन्य आजारांबाबत व्यापक

कल्याण : पावसाळ्यात साथीचे आजार पसरले असताना त्याकडे सोयीने दुर्लक्ष करणाऱ्या केडीएमसीने आता लांबलेल्या परतीच्या पावसात जलजन्य आजारांबाबत व्यापक मोहीम उघडली आहे. या आजारांचे वाढते प्रमाण पाहता नियंत्रणासाठी युद्धपातळीवर कार्यवाही करण्यासाठी केडीएमसीचे अतिरिक्त आयुक्त संजय घरत यांनी शुक्रवारी आढावा बैठक घेत विविध विभागांवर जबाबदारी निश्चित केली. साथीच्या आजारांचे प्रमाण दिवसागणिक वाढत आहे. ऊनपावसाच्या खेळात सर्वसाधारणपणे डेंग्यूच्या आजाराचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत. यात काहींचा डेंग्यूसदृश आजाराने मृत्यू झाला आहे. आजारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी वैद्यकीय आरोग्य विभागाने जागृतीपर पत्रके, पथनाट्ये, रुग्ण शोधमोहीम अशा नाना उपाययोजना करून पाहिल्या. परंतु, डेंग्यूची साथ कायम आहे. संपूर्ण पावसाळ्यात ही स्थिती कायम होती. मात्र, आता उशिरा का होईना, लांबलेल्या परतीच्या पावसात या आजारांबाबत व्यापक मोहीम महापालिकेने उघडली आहे. त्यात डासांच्या अळ्या आढळलेल्या बांधकामाच्या ठिकाणी ४८ तासांत डासअळीनाशक कार्यवाही करण्यासाठी बांधकाम व्यावसायिकांस नोटीस देणे, यानंतरही डासअळीनाशक कार्यवाही न करणाऱ्या बांधकाम व्यावसायिकांवर दंडात्मक कारवाई करणे, बांधकामाच्या ठिकाणी काम करणाऱ्या मजुरांची वैद्यकीय तपासणी करून घेणे, ही जबाबदारी नगररचना विभागावर सोपवली आहे. जंतुनाशक औषधे व धूरफवारण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ, औषधे व साधनसामग्रीसह उपलब्ध करणे, डासअळीनाशक कार्यवाही केल्यापासून १२ तासांनंतर केलेल्या कार्यवाहीची गुणवत्ता तपासण्याचे आदेश घनकचरा व्यवस्थापनाला दिले आहेत. सहायक सार्वजनिक आरोग्य अधिकाऱ्यांना सर्व प्रभागांतील कचरा उचलण्यासाठी आवश्यक वाहने व मनुष्यबळ उपलब्ध करून देणे, दैनंदिन कचरा उचलून स्वच्छता ठेवणे, गटारे वाहती करणे तसेच साठलेल्या पाण्याची डबके बुजवणे किंवा वाहते करण्यास सांगितले आहे.उघड्यावर खाद्यपदार्थ तयार करणे व त्याची विक्र ी करणाऱ्यांना प्रतिबंध करणे, डासअळीनाशक कार्यवाहीवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी प्रभाग क्षेत्र अधिकाऱ्यांवर सोपवण्यात आली आहे. आरोग्य विभागावर डेंग्यूचे रुग्ण जेथे मोठ्या प्रमाणावर आढळतील, अशा संवेदनशील भागाची निवड करणे, त्या परिसरात घरोघरी सर्वेक्षण करून तापाच्या रु ग्णांचे नमुने घेणे आदी जबाबदारी सोपवली आहे. या बैठकीला वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. स्मिता रोडे, सहायक सार्वजनिक आरोग्य अधिकारी व वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)