शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

स्वर संकल्प या संगीतमय कार्यक्रमात महिलांचा सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2020 00:02 IST

कला, क्रीडा, साहित्य, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, वर्तमानपत्र वितरक क्षेत्रातील दहा कर्तृत्ववान महिलांना सन्मानित केले.

ठाणे : प्रत्येक यशस्वी पुरु षामागे एक महिला असते. अशाच समाजातील कर्तृत्ववान महिलांचा सत्कार महिलादिनाचे औचित्य साधून करण्यात आला. अखिल भारतीय कला, क्रीडा व सांस्कृतिक अकादमीच्या संस्थापिका साक्षी परब यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या वेळी महिला कलादर्शन २०२० या कार्यक्र माचे नियोजन संकल्प इंग्लिश स्कूलच्या मुख्याध्यापिका डॉ. ज्योती परब मॅडम व त्यांच्या सहायक शिक्षकांनी केले. ‘लोकमत’ या कार्यक्रमाचे माध्यम प्रायोजक होते.

हौशी शिक्षकमंच आविष्कार आयोजित स्वर संकल्प हा कार्यक्र म रविवारी दुपारी १२ वाजता काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात झाला. कार्यक्र माची सुरुवात संस्थापिका साक्षी यांच्या गणेश वंदनेने झाली व त्याला कत्थकविशारद ज्योती सावंत यांनी भावमय नृत्याची साथ दिली. या कार्यक्र माचे औचित्य साधून संकल्प इंग्लिश स्कूलचे संस्थापक डॉ. शंकर (राज) परब व संचालिका तथा मुख्याध्यापिका डॉ. ज्योती परब यांनी ठाण्यातील काही कर्तृत्ववान महिलांना मानपत्र तसेच मानचिन्ह देऊन सन्मानित केले. या समारंभाला महापौर नरेश म्हस्के, माजी महापौर मीनाक्षी शिंदे, रूपाली रत्ने, ऋता आव्हाड, खगोल अभ्यासक ज्येष्ठ साहित्यिक दा. कृ. सोमण, संस्कृततज्ज्ञ ज्येष्ठ साहित्यिका मेघना सोमण आदी मान्यवर उपस्थित होते.

कला, क्रीडा, साहित्य, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, वर्तमानपत्र वितरक क्षेत्रातील दहा कर्तृत्ववान महिलांना सन्मानित केले. यामध्ये विजयलक्ष्मी गुप्ता, अनुजा घाडगे, प्रिया दरेकर, अंजुषा पाटील, पूजा कुलकर्णी, मनीषा कदम, प्रेरणा तावडे, करिष्मा खर्डीकर, वृषाली शिंदे, दीपाली साठे, समिधा पवार यांचा समावेश होता. विविध स्पर्धांतील विजेत्या महिलांनाही सन्मानित केले. याशिवाय नृत्यविशारद ज्योती सावंत, राकेश चोरगे व इतर चार महिला नृत्यांगनांचाही गौरव करण्यात आला.पाककला स्पर्धा : प्रथम- मंजुषा पांडे, द्वितीय -रंजना पांडव, तृतीय-धनश्री तावडे, उत्तेजनार्थ- श्रद्धा चव्हाण आणि पूनम देसाईकेशभूषा स्पर्धा : प्रथम- वनिता म्हात्रे, द्वितीय- रजनी जयस्वाल, तृतीय- संगीता चौहान. उत्तेजनार्थ- लतिका भोईर, संध्या डोंगरेकराओके गायन स्पर्धा :प्रथम- मानसी शेलार, द्वितीय- चैताली सांगवीकर, तृतीय- संजना जीजे, उत्तेजनार्थ- अंजली बोरुले, सुखद ठाकूर, मीनल धुळे