शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

महासभेतील निर्णयांचा मान राखा!

By admin | Updated: December 22, 2016 05:39 IST

महासभा असो अथवा स्थायी समितीची बैठक, अशा विविध सभांमध्ये घेतलेल्या निर्णयांवर प्रशासनाकडून कोणतीही कार्यवाही होत

कल्याण : महासभा असो अथवा स्थायी समितीची बैठक, अशा विविध सभांमध्ये घेतलेल्या निर्णयांवर प्रशासनाकडून कोणतीही कार्यवाही होत नाही. प्रशासनाच्या या उदासीनतेबाबत महापौर राजेंद्र देवळेकर यांनी आयुक्त ई. रवींद्रन यांना मंगळवारच्या महासभेत चांगलेच सुनावले. महासभेतील निर्णयांचा, आदेशांचा मान राखा. नगरसेवक मागत असलेली माहिती तत्काळ पुढच्या महासभेत देणे अपेक्षित आहे. परंतु, तसे होत नाही. याची गंभीर दखल घ्या आणि पुढील महासभेपासून ते सर्व विषयस्वरूपात पटलावर येऊ द्या, असे आदेश महापौरांनी दिले.कल्याणमधील शिवाजी चौक ते महंमदअली चौक मार्गावरील बहुचर्चित वाढीव बांधकामांचा मुद्दा २९ नोव्हेंबरच्या महासभेत चांगलाच गाजला होता. बेकायदा केलेल्या वाढीव बांधकामांसाठी उपायुक्त सुरेश पवार आणि ‘क’ प्रभाग अधिकारी अरुण वानखेडे यांनी एका व्यापाऱ्याकडे आपल्या नावाने आठ लाखांची मागणी केल्याच्या शिवसेना नगरसेवक श्रेयस समेळ यांच्या गंभीर आरोपाने सभागृहात एकच खळबळ उडाली होती. बेकायदा बांधकामांबाबत वारंवार तक्रारी करूनही महापालिका प्रशासन कोणतीच कारवाई करीत नसल्याच्या निषेधार्थ ही महासभा तहकूब करण्यात आली होती. बांधकामांना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करून आयुक्तांनी अहवाल पुढील महासभेत ठेवावा. अन्यथा, महासभा चालू देणार नाही, असा इशारा या वेळी मनसेचे गटनेते मंदार हळबे यांनी दिला होता.दरम्यान, मंगळवारी महासभा सुरू होताच समेळ यांनी अधिकाऱ्यांवर केल्या जाणाऱ्या कारवाईचे काय झाले, असा सवाल केला. मागील महासभेत कारवाईचे आश्वासन अतिरिक्त आयुक्त संजय घरत यांनी दिले होते. परंतु, आजपर्यंत कारवाई झालेली नाही, याकडे लक्ष वेधले. वाढीव बांधकामांच्या मुद्यावर महासभा तहकूब होऊनही प्रशासनाला कोणतेही गांभीर्य नाही, असा आरोप त्यांनी केला. या वाढीव बांधकामांचा मुद्दा नुकत्याच झालेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनातही उपस्थित झाला होता, असे समेळ यांनी सांगितले. महापौर देवळेकर यांनीही प्रशासनाच्या कृतीवर नाराजी व्यक्तकेली.सभागृहात नगरसेवक जे प्रश्न उपस्थित करतात, त्यांना प्रशासनाकडून उत्तरे मिळालीच पाहिजेत. जे निर्णय होतात, आदेश दिले जातात, त्यांची प्रशासनाकडून अंमलबजावणी होत नाही, हे चुकीचे आहे. यापुढे नगरसेवकांनी उपस्थित केलेल्या मुद्यावर कोणती कार्यवाही केली, याची माहिती सभागृहात प्रशासनाने दिली पाहिजे, अशा शब्दांत महापौरांनी आयुक्तांना सुनावले. (प्रतिनिधी)