शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
2
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
3
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
4
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
5
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
6
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
7
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
8
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
9
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
10
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
11
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
12
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
13
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
14
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
15
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
16
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
17
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
18
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
19
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
20
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...

घरत, पवारांवर कारवाईचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2018 02:14 IST

कल्याण-डोंबिवलीतील बेकायदा बांधकामांना जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांचे निलंबन करण्याच्या महासभेतील ठरावावर

कल्याण : कल्याण-डोंबिवलीतील बेकायदा बांधकामांना जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांचे निलंबन करण्याच्या महासभेतील ठरावावर योग्य ती कार्यवाही करण्याचे असे आदेश नगरविकास विभागाने आयुक्त गोविंद बोडके यांना दिले आहेत. या कारवाईची मागणी करणारे पत्र विरोधी पक्षनेते मंदार हळबे यांनी नगरविकास विभागाच्या सचिव मनीषा म्हैसकर यांना पाठवले होते. या आदेशामुळे संबंधित अधिकाºयांवर कारवाईची टांगती तलवार असून आयुक्तांच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे.अतिरिक्त आयुक्त संजय घरत, उपायुक्त सुरेश पवार आणि प्रभाग अधिकारी भागाजी भांगरे यांना निलंबित करा आणि चौकशीत दोषी ठरल्यास त्यांना सेवेतून बडतर्फ करा, असा हा ठराव होता. या पत्रावर नियमानुसार कार्यवाही करून त्याची माहिती सरकारला तसेच हळबे यांना द्यावी, असे हे आदेश आहेत. याआधी ५ मार्चलाही हळबे यांनी संबंधित अधिकाºयांची चौकशी करून कारवाईची मागणी नगरविकासकडे केली होती. त्यावरही ८ मार्चला आयुक्तांना पत्र पाठवून दहा दिवसांत अहवाल मागितला होता. पण अधिकाºयांनी खुलासे न पाठवल्याने तोही अद्याप दिलेला नाही.अतिरिक्त आयुक्त घरत हे त्यांच्या विशिष्ट कार्यपध्दतीमुळेच वादाच्या भोवºयात आहेत. बीएसयूपी प्रकरणात लाभार्थ्यांची यादी बनविण्यात केलेली दिरंगाई असो अथवा लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेचा भंग केल्याचा ठेवलेला ठपका असो यात तत्कालीन आयुक्त ई रवींद्रन यांनी कारणे दाखवा नोटीस बजावित त्यांची एक वार्षिक वेतनवाढ रोखल्याने ते पुन्हा चर्चेत आले होते. घरत यांच्याविरोधात माजी आयुक्त अर्दड यांनीही शासनाला अहवाल पाठवून त्यांच्यावर कारवाई करण्याची विनंती केली होती. यात त्यांनी इंजिन घोटाळा, घनकचरा व्यवस्थापन अंमलबजावणीत ठोस कृती नाही, २७ गावांमधील कामकाजाचे दफ्तर ताब्यात घेण्यातील दिरंगाईमुळे जबाबदारी अपेक्षित वेळेत पूर्ण न होण्याकडे लक्ष वेधले होते. मालमत्ता विवरण पत्रात माहिती दडविल्याच्या प्रकरणात विभागीय चौकशी आणि सुलेख डोण यांनी केलेल्या तक्रारीच्या आधारे ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून घरत यांची चौकशी सुरू आहे. उपायुक्त सुरेश पवार यांच्याविरोधातही लाचप्रकरणात २००८ मध्ये लाचलुचपत विभागामार्फत कारवाई झाली आहे.