शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

घरतच्या विभागीय चौकशीचा ठराव मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2019 00:20 IST

महासभेची मंजुरी; लाचखोरीची चौकशी

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेचे लाचखोर अतिरिक्त आयुक्त संजय घरत यांच्या विभागीय चौकशीचा ठराव गुरुवारी पार पडलेल्या महासभेत अखेर मंजूर करण्यात आला आहे. हा प्रस्ताव सहा महिन्यांच्या आत येणे अपेक्षित होते. मात्र, त्याला प्रशासनाकडून विलंब झाला. हा विलंब का झाला, याविषयी सदस्यांनी आयुक्तांकडे विचारणा केली. मात्र, त्यावर आयुक्तांनी काहीएक उत्तर दिले नाही.घरत याने २७ गावांतील एका बांधकाम व्यावसायिकाकडे कारवाई न करण्याच्या बदल्यात ४२ लाख रुपयांची लाच मागितली होती. लाचेच्या मागणीवर तडजोड करून ३५ लाख रुपये घेण्याचे ठरले. ३५ लाखांपैकी आठ लाखांची रक्कम स्वीकारताना १३ जून २०१८ रोजी घरत याला लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने अटक केली.१४ जून रोजी महापालिकेने घरत याला निलंबित केले. मात्र, त्याच्याविरोधात विभागीय चौकशी करण्याच्या प्रस्तावावर आयुक्त सही करत नव्हते. त्याच्याकडून जाणीवपूर्वक विलंब झाल्याचा आरोप मनसेकडून केला जात होता. आयुक्तांनी त्यावर सही केल्यावर हा प्रस्ताव गुरुवारच्या महासभेसमोर मंजुरीसाठी ठेवला गेला. त्याला महासभेने मंजुरी दिली आहे.यापूर्वी घरत याच्या चौकशीसाठी नेमलेल्या चौकशी समितीमधील उपायुक्तांनी रजेवर जाण्याचे कारण शोधत पळ काढला. त्यामुळे घरत याची विभागीय चौकशी कोण करणार, त्यासाठी उपायुक्त दर्जाचा आयुक्त महापालिकेत आहे की नाही, त्याचा अहवाल कधी महासभेसमोर ठेवला जाईल, याविषयी मनसे गटनेते मंदार हळबे यांनी प्रश्न उपस्थित केला. शिवसेना नगरसेवक प्रकाश पेणकर यांनी यापूर्वी किती लाचखोर अधिकाऱ्यांची विभागीय चौकशी केली आहे, त्यांच्या चौकशीचे अहवाल महासभेसमोर का ठेवले गेले नाहीत, याकडे लक्ष वेधले. शिवसेना नगरसेवक सचिन बासरे म्हणाले की, प्रशासनाकडून घरत याच्या चौकशीचा प्रस्ताव सहा महिन्यांच्या आत महासभेत येणे अपेक्षित होते. तसेच घरत याच्याविरोधात विभागीय चौकशी करण्यास मान्यता दिली जात असली, तरी त्याला सेवेत घेऊ नये, असा स्पष्ट उल्लेख ठरावात करा, अशी मागणी केली.या चर्चेच्या वेळी घरत समर्थक सदस्यांनी चर्चेत सहभागी न होता मिठाची गुळणी धरली होती. हा विषय सभेत आला असता सुरूवातीला सभागृहात शांतता पसरली होती. त्यामुळे घरतच्या विषयावर कोणी चर्चा करणार की नाही, असा प्रश्न उपस्थित केला गेला.किशोर शेळकेंना पदभारउपसचिवपदाची परीक्षा किशोर शेळके यांनी दिली होती. सर्वाधिक गुण शेळके यांना मिळाले होते. शेळके यांचा महापालिकेच्या निवडयादीत समावेश करण्यात आला होता. मात्र, त्यांच्या पदाला मान्यता दिलेली नव्हती.आजच्या महासभेत शेळके यांच्या उपसचिवपदास मंजुरी दिली आहे. त्यानुुसार, उपसचिवपदी शेळके हे काम पाहणार आहेत. शेळके हे महिला बालकल्याण समितीत सचिवपदी कार्यरत होते. ते आता महापालिकेचे उपसचिव झाले आहेत.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिका