शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

आयुक्तांवर कागदपत्रे भिरकावणारा ताब्यात

By admin | Updated: January 10, 2017 06:18 IST

वारंवार तक्रार करूनही पाणीगळतीचा प्रश्न सुटत नसल्याने आणि लोकशाही दिनातही खेटे घालायला लागत असल्याने कल्याण-डोंबिवलीचे आयुक्त

कल्याण : वारंवार तक्रार करूनही पाणीगळतीचा प्रश्न सुटत नसल्याने आणि लोकशाही दिनातही खेटे घालायला लागत असल्याने कल्याण-डोंबिवलीचे आयुक्त ई. रवींद्रन यांच्या दिशेने कागद भिरकवणाऱ्या नागरिकाला बाजारपेठ पोलिसांनी ताब्यात घेतले. हरिश्चंद्र यादव असे त्याचे नाव आहे. तो सूचकनाका येथे राहतो. महापालिकेच्या लोकशाही दिनात सोमवारी ही घटना घडली.यादवच्या परिसरात पाणी गळतीची समस्या आहे. त्याच्या भावाच्या जागेवर अतिक्रमण करून शाळा बांधली आहे. ते हटविण्यासाठी पालिकेकडे ते गेली सात वर्षे पाठपुरावा करत आहेत. त्याला प्रशासनाकडून दाद दिली जात नाही. गेल्या चार लोकशाही दिनापासून ते महापालिकेत खेटे घालत आहेत. लोकशाही दिनात सोमवारी त्यांचा नंबर आला. त्यांनी आयुक्त रवींद्रन यांच्या दालनात प्रवेश केला, तेव्हा त्यांच्या दिशेने कागद भिरकावल्याचे आयुक्तांचे म्हणणे आहे. त्यामुळे आयुक्तांनी महापालिकेच्या सुरक्षारक्षकाना बोलावले. रक्षकांनी यादव यांना पकडून बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या हवाली केले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. रात्री उशिरापर्यंत त्यांची सुटका झालेली नव्हती. यासंदर्भात विचारणा केल्यावर यादव म्हणाले, आयुक्तांच्या दिशेने मी माझ्या कामाची फाईल सरकवली. त्यांनी त्याचा गैरअर्थ घेऊन भिरकावल्याचा समज करुन घेतला. मला पोलिसांच्या हवाली केले. पोलिसांनी मला बसवून ठेवले आहे. (प्रतिनिधी)