शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

...त्यांचा काळही आला होता आणि वेळही!

By admin | Updated: August 8, 2016 02:21 IST

दुर्घटना घडली, त्या इमारतीच्या मालकाला दररोज सकाळी साडेसहाच्या दरम्यान कुत्र्याला फिरायला घेऊन जाण्याची सवय होती. तसेच ते रविवारी सकाळीही गेले

दीपक देशमुख , वज्रेश्वरीदुर्घटना घडली, त्या इमारतीच्या मालकाला दररोज सकाळी साडेसहाच्या दरम्यान कुत्र्याला फिरायला घेऊन जाण्याची सवय होती. तसेच ते रविवारी सकाळीही गेले, तेव्हा ते परतत असताना इमारत थोडी कलत असल्याचे खाली उभ्या असलेल्या रहिवाशांनी त्यांना सांगितले आणि त्यांनी सज्जन गुप्ता यांना वर जाण्यापासून रोखले. पण, पत्नी वर झोपली आहे. तिला घेऊन येतो आणि इमारतीची कागदपत्रे आणतो, असे सांगून ते त्याही स्थितीत वर गेले आणि लगेचच इमारत कोसळली. पत्नीसह त्यांचाही मृत्यू झाला... त्यांचा काळही आला होता आणि वेळही...अतिधोकादायक म्हणून घोषित केलेल्या महादेव इमारतीचे मालक स्वत: गवंडीकाम करीत असत आणि ३५ वर्षांपूर्वी त्यांनी स्वत: ही इमारत बांधली होती. ती इमारत अनधिकृत होती आणि इमारतीत मालकासह १० कुटुंबे राहत होती. तळ मजल्यावर चार दुकाने होती. ही इमारत रिकामी करण्याची नोटीस पालिका २०१४ पासून देत होती. अखेरीस या वर्षी जूनमध्ये ती अतिधोकादायक जाहीर करून तिचे वीज-पाणी तोडण्यात आले होते. पागडी पद्धतीने भाडेकरू राहत असल्याने घरांवर मालकी हक्क असल्याचा त्यांचा दावा होता. त्यासाठी घरे सोडण्यापूर्वी त्यांना तशी कागदपत्रे हवी होती. पण, इमारतीच्या मालकीवरून भाऊबहिणींत वाद असल्याने सज्जन गुप्ता तसे एकतर्फी लिहून देण्यास तयार नव्हते. त्यातून तोडगा काढण्यासाठीच शुक्रवारी मालक-भाडेकरूंची मीटिंग झाली होती. त्यात बांधकाम खर्चापोटी प्रत्येक चौरस फुटाला १२०० रुपयांचा भाव मालकाने सांगितला. तो भाडेकरूंनी मान्यही केला आणि रविवारी घरे सोडण्याचे ठरवण्यात आले. पण, घरे सोडण्यापूर्वीच घात झाला...मालक-भाडेकरूंच्या वादात दुसऱ्या भागातील काही भाडेकरूंनी पर्यायी घरे शोधली, काही शोधत होते. मात्र, जो भाग रविवारी कोसळला, त्यातील ठाकूर कुटुंबही घर शोधत होते. पण, त्यांना हवे तसे घर मिळाले नव्हते. त्यापूर्वीच काळाने त्या पूर्ण कुटुंबावर झडप घातली, असे ठाकूर यांचा चुलत भाऊ जितेंद्र राजपूत याने सांगितले. संबंधित वृत्त/५