शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

हिंदूंनी वाचवली मशीद

By admin | Updated: April 20, 2017 03:51 IST

कल्याण-भिवंडी मार्गालगत असलेल्या कोन गावातील एका मशीदीवर कारवाई करण्यासाठी एमएमआरडीएचे पथक मंगळवारी पोहचले तेव्हा या कारवाईस हिंदू

कल्याण : कल्याण-भिवंडी मार्गालगत असलेल्या कोन गावातील एका मशीदीवर कारवाई करण्यासाठी एमएमआरडीएचे पथक मंगळवारी पोहचले तेव्हा या कारवाईस हिंदू बांधवांनी विरोध केला. मशीदीवर कारवाई केल्यास ‘आम्ही मंदीर तोडू आणि ते एमएमआरडीएने तोडल्याचे सांगू,’ असा पावित्रा हिंदू ग्रामस्थांनी घेतल्याने एमएमआरडीएला कारवाई न करताच हात हालवत माघारी फिरावे लागले. त्यानंतर मुस्लिमांनी मशीद तोडण्यास विरोध करणाऱ्या हिंदूंचा जाहीर सत्कार केला व आभार मानले. हिंदू मुस्लिम भाईचारा ग्रामीण भागात कसा घट्ट आहे, त्याचे उदाहरण पाहावयास मिळाले. कोन गावातील खाडी किनारी तडीपार भागात तकवा नावाची मशीद आहे. ही मशीद २००३ मध्ये बांधण्यात आली.भिवंडी महापालिका व महापालिका नजीकची भिवंडी तालुक्यातील अनेक गावे ही एमएमआरडीए नियोजन प्राधिकरणाच्या अंतर्गत येतात. ही मशीद पाडण्यासाठी एमएमआरडीएने ७ एप्रिल रोजी नोटीस दिली होती. मशीद पाडण्यासाठी एमएमआरडीएचे अधिकारी मंगळवारी पथकासह कोन गावात पोहचले. ५०० पोलीस, दोन जेसीबी आणि एक पोकलेन असा फौजफाट घेऊन पथक मशीदीपाशी पोहचले. त्यावेळी गावातील हिंदू बांधवांनी कारवाईस मज्जाव केला. पथकाने मशीदवर हातोडा चालविल्यास आम्ही स्वत: गावातील मंदिर पाडू आणि हे मंदिर एमएमआरडीएने पाडल्याचे सांगू असा दम भरला. हिंदूंचा हा पावित्रा पाहून पथकाला चांगलाच घाम फुटला. त्यामुळे ते पथक माघारी परतले.कल्याणमधील मुस्लिम समाजाचे कार्यकर्ते शरफूद्दीन कर्ते, नगरसेवक काशीब तानकी, मशीदचे प्रमुख रईस खान मोकाशी, ग्रामपंचायतीचे पदाधिकारी फरदीन करेल यांनी कोन गावच्या सरपंच डॉ. रुपाली अमोल, उपसरपंच महेंद्र नाईक, विनोद म्हात्रे, डॉ. अमोल कराळे यांच्यासह अन्य हिंदू बांधवांचा ग्रामपंचायत कार्यालयात सत्कार केला. यावेळी मुस्लिम बांधव हिंदूंनी घेतलेल्या पुढाकाराने भारावले होते. (प्रतिनिधी)