शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यातील ‘हिलग्रेंज’ जलश्रीमंत!

By admin | Updated: April 11, 2016 01:26 IST

पाण्याच्या थेंबाथेंबासाठी सर्वत्र संघर्ष सुरू असतानाच ठाणे शहरातील हिरानंदानी इस्टेटमधील ‘हिलग्रेंज’ सोसायटीत मात्र जलश्रीमंत आहे.

प्रज्ञा म्हात्रे,  ठाणेपाण्याच्या थेंबाथेंबासाठी सर्वत्र संघर्ष सुरू असतानाच ठाणे शहरातील हिरानंदानी इस्टेटमधील ‘हिलग्रेंज’ सोसायटीत मात्र जलश्रीमंत आहे. २००५पासून या सोसायटीने राबवलेल्या विविध उपक्रमांमुळे संपूर्ण महाराष्ट्रात पाण्याची टंचाई असतानाही या सोसायटीत २४ तास पाणी मिळत आहे. यातही सजग नागरिक म्हणून ही सोसायटी या पाण्याचा मर्यादित वापर करीत आहे. बोअरवेल, रेनवॉटर हार्वेस्टिंग, पाणी शुद्धीकरण, एसीमधून पडणाऱ्या पाण्याची बचत यांसारखे अभिनव उपक्रम राबविणारी ही सोसायटी ठाण्यातील इतर सोसायट्यांसाठी प्रेरणादायी आदर्श ठरली आहे. भविष्यात होणारी पाणीटंचाईची दूरदृष्टी ठेवून या सोसायटीने पाणी बचतीचे विविध प्रकल्प राबविले आणि आजच्या भीषण टंचाईत या प्रकल्पांचा फायदा या सोसायटीला होत आहे. घोडबंदर रोड येथे असलेल्या या सोसायटीत २००३ साली ज्यावेळी रहिवाशी राहण्यास आले तेव्हा सुरुवातीला त्यांना पाण्याचा प्रचंड त्रास जाणवू लागला. तब्बल २०० सदनिकांच्या सोसायटीला ठाणे महानगरपालिकेकडून पाणी मिळत होते; परंतु ते मुबलक नव्हते. त्यामुळे सोसायटीने टँकरचे पाणी मागविण्यास सुरुवात केली. तेही पाणी दूषित असल्याने लहान मुले, ज्येष्ठ नागरिकांची तब्बेत बिघडण्यास सुरुवात झाली. यावर पहिला तोडगा म्हणून सोसायटीने २००५ साली बोअरवेल हा प्रकल्प राबविला. त्यानंतर २००७ ते २००९ या तीन वर्षांच्या कालावधीत चार बोअरवेल तयार केले; परंतु या बोअरवेलमधील पाणी पिण्यालायक नसल्याने ते शुद्ध करून प्यावे लागत होते. त्यामुळे रहिवाशांनी विकत पाणी आणण्यास सुरुवात केली. ते फार खर्चीक होऊ लागले. यावरही सोसायटीने अभिनव तोडगा काढला. सोसायटीमध्येच २००९ साली जलशुद्धीकरणाचा प्रकल्प उभारला. दर महिन्याला या प्लाण्टमधील पाणी पिण्यालायक आहे की नाही हे तपासण्यासाठी सरकारमान्य प्रयोगशाळेत त्या पाण्याचा नमुना पाठविला जातो आणि प्रयोगशाळेतून उत्तम पिण्यालायक पाणी असल्याचे प्रमाणपत्रही मिळत असल्याचे सोसायटीचे उपाध्यक्ष सुनील हडकर यांनी सांगितले. पाण्याची समस्या लक्षात घेता रोज गाड्या धुण्याचे प्रमाणही कमी केले.