शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
4
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
7
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
8
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
9
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
10
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
11
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
12
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
13
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
14
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
15
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
16
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
17
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
18
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
19
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
20
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

महाविद्यालयांसमोर रोडरोमिओंचा हैदोस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2020 23:40 IST

भाजपचे पोलिसांना निवेदन : कडक कारवाई करण्याची मागणी, उल्हासनगरमध्ये गुन्हेगारी वाढली

उल्हासनगर : शहरातील पालिकेच्या शाळेसमोर उभे राहून मुलींची छेड काढणाऱ्या रोडरोमिओंविरोधात कारवाई करण्याचे निवेदन भाजप शिष्टमंडळाने उल्हासनगर पोलिसांना मंगळवारी दिले. यापूर्वी शहरातील गुन्हेगारीबाबतही पोलीस उपायुक्तांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिल्याची माहिती राजेश वधारिया यांनी दिली.

उल्हासनगरात गुन्हेगारी वाढली असून, याप्रकरणी कारवाई करण्याची मागणी सर्वपक्षीय नेत्यांनी पोलीस उपायुक्त प्रमोदकुमार शेवाळे यांना निवेदनाद्वारे केली. शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनीही मुख्यमंत्र्यांना साकडे घालून गृहमंत्री अनिल देशमुख यांना निवेदन दिले. गुन्हेगारी व अमली पदार्थ तस्करांवर पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. आता नागरिकांसमोर वेगळाच प्रश्न उभा ठाकला आहे. पालिकेच्या शाळा प्रवेशद्वारासमोर रोडरोमिओंचा अड्डा असून मुलींना छेडण्याच्या प्रकारांत वाढ झाली आहे. मुलींच्या पालकांनी विरोध केल्यास त्यांना मारहाण करण्याचेही प्रकार घडल्याचा आरोप भाजप नेते आणि स्थायी समिती सभापती राजेश वधारिया यांनी करत याप्रकरणी कारवाई करण्याची मागणी त्यांनी उल्हासनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कदम यांच्याकडे केली. गेल्या आठवड्यात रिक्षाने जाणाºया कॉलेज तरुणीची छेडछाड केल्याचा प्रकार घडला होता. याशिवाय, आरकेटी कॉलेजच्या एका मुलीला सपना गार्डनसारख्या वर्दळीच्या ठिकाणी रस्त्यात अडवून तिची छेड काढली होती. याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होऊनही कारवाई न झाल्याने मुलींच्या वडिलांनी हा प्रकार सोशल मीडियावर शेअर केला असता, शिवसेनेने मुलीला संरक्षण देण्याचे आश्वासन दिले. कॉलेज, शाळा परिसर तसेच उल्हासनगर, शहाड व विठ्ठलवाडी रेल्वेस्टेशन परिसरात हे प्रकार होत आहेत. याला आळा घालण्याची मागणी सर्वस्तरातूंन होत आहे. चायनीज खाद्यपदार्थविक्रेते गावठी दारू पिण्यास सर्रास परवानगी दिली जात असल्याचा आरोपही वधारिया यांनी निवेदनात केला.पोलीस बंदोबस्ताची मागणीशाळा व महाविद्यालयांसमोर रोडरोमिओंची दादागिरी आणि मुलींच्या छेडखानीचे प्रकार वाढत आहेत. याला आळा घालण्यासाठी शाळा व महाविद्यालयांच्या प्रवेशद्वारांवर शाळा भरण्याच्या आणि सुटण्याच्या वेळेला पोलीस बंदोबस्त ठेवण्याची मागणी सर्वस्तरांतून होत आहे. रोडरोमिओंचा वेळीच बंदोबस्त केला नाही तर, भविष्यात मोठी दुर्घटना घडण्याची भीती पालक व्यक्त करीत आहेत.